
नारायण येवले
चिखलदरा : पावसाळ्यात पर्यटननगरी चिखलदऱ्यातील निसर्गसौंदर्य चांगलेच बहरले असून निसर्गाचा मनमुराद आनंद घेण्यासाठी दररोज हजारो पर्यटक चिखलदऱ्यात दाखल होत आहेत. पर्यटकांच्या गर्दीचा फायदा स्थानिक नगरपरिषदेला झाला असून मागील तीन दिवसांत पर्यटकांकडून सात लाख १४ हजार ९२० रुपयांची पर्यटनकराची वसुली करण्यात आली आहे.