Buldhana Accident: मंगरूळ नवघरे येथे काळी पिवळी आणि दुचाकीची भीषण धडक; ३५ वर्षीय तरुणाचा जागीच मृत्यू
Fatal Auto-Rickshaw and Bike Collision in Chikhli: चिखली तालुक्यातील मंगरूळ नवघरे येथे काळी-पिवळी व दुचाकीच्या भीषण अपघातात तरुणाचा जागीच मृत्यू झाला. पेठ चढावर घडलेल्या या अपघातामुळे सपकाळ कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला.
मंगरूळ नवघरे (चिखली) : काळी-पिवळी आणि दुचाकीच्या भीषण धडकेत एकाचा जागीच मृत्यू झाला,ही दुर्दैवी घटना आज १५ डिसेंबर रोजी दुपारी ४ वाजेदरम्यान गावशिवारातील गोविंदा शेळके यांच्या शेताजवळील पेठ चढावर घडली.