चांदूरबाजार (जि. अमरावती) : ज्यांच्याकडे न्यायाच्या अपेक्षेने पाहिले त्या अधिकाऱ्यांनी टोलवाटोलवी केली. हातातोंडाशी आलेला घास हिरावला. माह्या पोरानं विष घेतले, आता तो मरणाच्या दारात उभा आहे, सांगा आता जगावे तरी कसे?, पेरलंच नाही तर खाणार काय? अशा शब्दांत चांदूरबाजार येथील रामेश्वर वाटाणे या हतबल पित्याने आपल्या (farmers suicide case) भावना व्यक्त केल्या. (child-at-the-door-of-death-how-to-live?)
शेतात जाण्याचा रस्ता बंद केल्याने रामेश्वर वाटाणे यांचा मुलगा सचिन वाटाणे यांनी सोमवारी (ता. २८) दुपारच्या सुमारास नायब तहसीलदारांच्या दालनातच विष प्राशन केले. त्यांना जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यांची प्रकृती चिंताजनक आहे. मात्र, घरी करणारे कुणीच नसल्याने पिता रामेश्वर वाटाणे आपल्या एका सहकाऱ्यासह जिल्हा सामान्य रुग्णालयात मुलाच्या प्रकृतीवर लक्ष ठेवून आहेत.
दुसरीकडे सगळीकडे पेरणीचा हंगाम संपला, मात्र वाटाणे यांचे शेत पडीक पडले आहे. पेरण्यासाठी कुणीच नसल्याने आता उदरनिर्वाह तरी कसा करावा, असा गंभीर प्रश्न त्यांच्या समोर उभा राहिला आहे. वाटाणे यांचे बेलोरा बेसखेडा मार्गावर शेत असून बाजूलाच असलेल्या शेतकऱ्यांनी त्यांच्या शेतात जाण्याचा रस्ता बंद केला, असा आरोप रामेश्वर वाटाणे यांनी केला आहे. याबाबत आम्ही तहसीलदारांकडे तक्रार दाखल केली होती.
तहसीलदारांनी २८ जूनची तारीख दिली, माझा मुलगा मोठ्या आशेने तहसील कार्यालयात गेला, मात्र तेथे टोलवाटोलवी करण्यात येत असल्याने त्याने विष प्राशन केले, असे रामेश्वर वाटाणे यांनी सांगितले. आता त्याच्या प्रकृतीत चढउतार येत आहे. घरी आई, पत्नी, दोन मुले आहेत. कुणाला काहीच कळत नाही, आता न्याय कोणाला मागावा? असा प्रश्न रामेश्वर वाटाणे यांनी उपस्थित केला.
(child-at-the-door-of-death-how-to-live?)
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.