
गोंदिया : परसवाडा येथील हनुमान मंदिर सामूहिक विवाह समितीतर्फे परसवाडा येथे २०२३ रोजी आयोजित सामूहिक विवाह सोहळ्यात सातपैकी तीन बालविवाह झाल्याचे निष्पन्न झाले. या प्रकरणी दवनीवाडा पोलिसांनी दहा जणांवर बालविवाह प्रतिबंधक अधिनियमानुसार गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणाची सखोल चौकशी सुरू असून आणखी काही जणांवर गुन्हे दाखल होण्याची शक्यता आहे.