
वर्धा : इन्स्टाग्राम, फेसबुक, व्हॉट्सअॅप हे सोशल मीडियाचे प्लॅटफॉर्म जीवनाचा अविभाज्य भाग बनले. आबालवृद्धही सोशल मीडियाच्या मायाजालामध्ये गुरफटले. सोशल मीडियावर आवश्यक निर्बंध नसल्याने बहुतेकदा लोकांना विकृतीकडे घेऊन जाणाऱ्या पोस्ट येथे पाहायला मिळतात.