
कोदामेंढी (मौदा) : मागील दोन चार वर्षापासून मिरची उत्पादक शेतकऱ्यांच्या नशिबी निराशा पाहायला मिळत असली तरी उत्पादकांनी अजून आशा काही सोडली नाही. म्हणतात ना ‘लागली तर लाखाची, नाही तर फाकाची’ या आशेवर शेतकरी अवलंबून आहे. मागील वर्षी मिरचीला फारसा भाव नव्हता.