अति पावसामुळे मिरची पीक धोक्‍यात

संदीप गौरखेडे
बुधवार, 25 सप्टेंबर 2019

कोदामेंढी (जि.नागपूर) :: "लागली तर लाखाची, नाही तर फाकाची' अशी मिरचीच्या बाबतीत म्हण आहे. मागील दोन वर्षांच्या तुलनेत यंदा सरासरीपेक्षा पावसाने चांगलीच हजेरी लावली. मौदा तालुका भात पिकांबरोबरच मिरचीच्या लागवडीत अग्रेसर आहे. सतत सुरू असलेला पाऊस भात पिकाला लाभदायक असला तरी कापूस, पालेभाज्या, सोयाबीन आणि मिरची पिकाला नुकसानदायक ठरत आहे. मिरची पिकाला फुलबहार आलेला आहे. मात्र, सतत सुरूअसलेल्या पावसामुळे मिरची लागवड शेतकऱ्यांची चिंता वाढविली आहे.मौदा तालुक्‍यात यंदा सरासरी 1063 मिमीपैकी 1038 मिमी पावसाची नोंद झाली असून जवळपास 98 टक्‍के पाऊस बरसला आहे.

कोदामेंढी (जि.नागपूर) :: "लागली तर लाखाची, नाही तर फाकाची' अशी मिरचीच्या बाबतीत म्हण आहे. मागील दोन वर्षांच्या तुलनेत यंदा सरासरीपेक्षा पावसाने चांगलीच हजेरी लावली. मौदा तालुका भात पिकांबरोबरच मिरचीच्या लागवडीत अग्रेसर आहे. सतत सुरू असलेला पाऊस भात पिकाला लाभदायक असला तरी कापूस, पालेभाज्या, सोयाबीन आणि मिरची पिकाला नुकसानदायक ठरत आहे. मिरची पिकाला फुलबहार आलेला आहे. मात्र, सतत सुरूअसलेल्या पावसामुळे मिरची लागवड शेतकऱ्यांची चिंता वाढविली आहे.मौदा तालुक्‍यात यंदा सरासरी 1063 मिमीपैकी 1038 मिमी पावसाची नोंद झाली असून जवळपास 98 टक्‍के पाऊस बरसला आहे. तालुक्‍यातील धानला, धर्मापुरी, दहेगाव, रेवराल, अरोली, कोदामेंढी, खात, मोरगांव आदी गावात मोठ्‌या प्रमाणात मिरचीची लागवड होते. मे ते जून महिन्यापर्यंत चालणारे पीक असून निसर्गाची साथ आणि बाजारभाव चांगला मिळाल्यास नफा मिळवून देणारे पीक आहे. बरेचसे शेतकरी नक्षत्र पाहूनदेखील मिरचीची लागवड करतात. काहींची मिरची पिकाची लागवड सुरू असून सुरुवातीला लागवड करणाऱ्या काही शेतकऱ्यांकडून मिरचीचा तोडा सुरू आहे. सततच्या पावसामुळे मिरची लागवड शेतकरी मेटाकुटीस आलेला दिसून येत आहे. पावसामुळे रोपांची लागवड करणे शक्‍य होत नसून बुरशीमुळे मिरचीचे नुकसान होत आहे.
सध्या सर्व पीकस्थिती चांगली आहे. मात्र, सात आठ दिवस पाऊस पडल्यास सोयाबीन पिकाचे नुकसान होऊ शकते.
रविकांत वासनिक
तालुका कृषी अधिकारी

पावसामुळे बरेचशे मिरचीचे पीक सडू लागले आहे. आलेला फुलबहार झडत आहे. मिरचीचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे. काही शेतकऱ्यांचा मिरची तोडा सुरू असून झाडाची मिरची सडू लागली आहे.
मुरली तांबुलकर
व्यापारी तसेच शेतकरी
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Chilli crop is at risk due to heavy rainfall