Crime News : चिमुरात दोन अल्पवयीन मुलींवर अत्याचार; संतप्त जमावाचा पोलिस ठाण्याला वेढा, दगडफेक, महिला पोलिस जखमी
Chimur crime : चिमुरात दोन अल्पवयीन मुलींवर अत्याचार झाल्याने संतप्त जमावाने पोलिस ठाण्याला घेराव घातला. दगडफेकीत एक महिला पोलिस आणि होमगार्ड जखमी झाले असून, शहरात तणावपूर्ण शांतता आहे.
चिमूर : शहरातील दोन अल्पवयीन मुलींवर अत्याचार केल्याची घटना सोमवार (ता. १४) रात्री १० वाजताच्या सुमाराला उघडकीस आली. या प्रकरणातील दोन आरोपींना पोलिसांना ताब्यात घेतले.