esakal | चिन्मय सोमैया, सृष्टी हेलंगडीला अव्वल मानांकन
sakal

बोलून बातमी शोधा

टेबल टेनिस

चिन्मय सोमैया, सृष्टी हेलंगडीला अव्वल मानांकन

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

नागपूर ः नागपूर जिल्हा टेबल टेनिस संघटनेच्या यजमानत्वाखाली 7 ते 11 सप्टेंबर या कालावधीत होणाऱ्या चौथ्या महाराष्ट्र राज्य खुल्या मानांकन टेबल टेनिस स्पर्धेत पुरुषांत मुंबई उपनगरच्या चिन्मय सोमैया आणि महिलांत सृष्टी हेलंगडी यांना अव्वल मानांकन देण्यात आले आहे. चिन्मयला युवा आणि ज्युनिअर गटातही अव्वल मानांकन देण्यात आले आहे. मुलींच्या कॅडेट गटात नागपुरची जेनीफर वर्गीस अव्वल मानांकित आहे, अशी माहिती जिल्हा टेबल टेनिस संघटनेचे सचिव ऍड. आशुतोष पोतनीस यांनी पत्रकार परिषदेत दिली. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या सभागृहात होणाऱ्या या स्पर्धेत राज्यातील जवळ-जवळ एक हजार खेळाडू भाग घेणार आहेत. यात नागपुरच्या 120 खेळाडूंचा समावेश आहे. त्यांना एकूण दीड लाख रुपयांचे पुरस्कार वितरित करण्यात येतील. स्पर्धा एकूण 12 गटांत होईल. पहिल्या दिवशी पुरुष, महिला, युवा मुले व युवा मुलींचे सामने होतील. सात तारखेला सकाळी दहाला मध्य नागपूरचे आमदार विकास कुंभारे यांच्या हस्ते स्पर्धेचे उद्‌घाटन होईल. यावेळी नागपूर सहकारी बॅंकेचे चेअरमन संजय भेंडे, राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या शारीरिक शिक्षण विभागाचे संचालक डॉ. शरद सूर्यवंशी उपस्थित राहतील. पत्रकार परिषदेला जिल्हा टेबल टेनिस संघटनेचे उपाध्यक्ष शेखर टोंगो, आंतरराष्ट्रीय पंच मंगेश मोपकर, स्पर्धेचे समन्वयक राजेश मोपकर आणि दीपक कानेटकर उपस्थित होते. मानांकन ः पुरुष ः चिन्मय सोमैया, जिग्नेश रहातवाल (दोघेही मुंबई उपनगर), शुभम आम्ब्रे (मुंबई शहर), जश दळवी (ठाणे), महिला ः सृष्टी हेलंगडी, ममता प्रभू (दोघी मुंबई उपनगर), सेनोरा डिसुझा (मुंबई शहर), अनन्य बसाक (मुंबई उपनगर), युवा मुले ः चिन्मया सोमैया (उपनगर), शुभम आम्ब्रे (मुंबई शहर), अश्‍वीन सुब्रमनियन (उपनगर), गौरव लोहपात्रे (पुणे), युवा मुली ः अनन्या बसाक, विधी शहा (दोघी उपनगर), समृद्धी कुळकर्णी (सोलापूर), दिशा हुलावले (ठाणे), ज्युनिअर मुले ः चिन्मया सोमैया (उपनगर), शौनक शिंदे (पुणे), शिवम दास (उपनगर), साहिल जोशी (ठाणे), ज्युनिअर मुली ः आदिती सिन्हा (उपनगर), समृद्धी कुळकर्णी (सोलापूर), प्रिथा वर्टीकर (पुणे), तेजल कांबळे (ठाणे), सबज्युनिअर मुले ः आदिल आनंद, राजवीर शहा (दोघे उपनगर), शर्मन देढीया (ठाणे), कुशल पटेल (उपनगर), सबज्युनिअर मुली ः संपदा भिवंडकर (उपनगर), प्रिथा वर्टीकर (पुणे), सायली वाणी (नाशिक), तनिशा कोटेचा (नाशिक), कॅडेट मुले ः हृदय देशपांडे, उदित सचदेव (दोघे ठाणे), प्रणव घोलकर (पुणे), अनघ बोंडवे (नागपूर), कॅडेट मुली ः जेनिफर वर्गीस (नागपूर), अनन्या फडके (नाशिक), देवयानी कुळकर्णी (पुणे), काव्या भटट (ठाणे), मिजेट मुले ः शोरेन सोमन (पुणे), जोहान चेलीपरंबील, नीलय पटटेकर, आरुष शहा (तिघे ठाणे), मुली ः रिआना भुता (ठाणे), निशा रेवसकर (पुणे), स्वरा जांगडे (ठाणे), तनया अभ्यंकर (पुणे). 

loading image
go to top