गस्तीदरम्यान आढळला भ्रमणध्वनी, टिफिन, पुढे उघडकीस आला हा प्रकार...

सकाळ वृत्तसेवा
Friday, 26 June 2020

मारेगाव तालुक्‍यातील वनपरिक्षेत्रापैकी मार्डीजवळील फिस्की मोठे क्षेत्र आहे. या जंगलातील मच्छिंद्रा या गावाजवळ 24 जून रोजी सकाळच्या सुमारास शिकार झाल्याची माहिती मिळताच वनविभागाचे बिट वनरक्षक आर. यू. पारधी यांनी सहकाऱ्यांसोबत जाऊन पाहणी केली असता त्यांना मच्छिंद्रा गावाजवळ असलेल्या कक्ष क्र.2 च्या शेताजवळ चिंचाळा येथील कान्होबा परमेश्वर खंडरे याचा भ्रमणध्वनी, सुरी, कुऱ्हाड व रिकामा टिफिन आढळला.

मारेगाव (जि. यवतमाळ) : मार्डीजवळ असलेल्या फिस्कीच्या जंगलात चितळ हरणाची शिकार झाल्याची गुप्त माहिती वनविभागाला मिळाल्यावरून वनविभागाने तत्काळ कारवाई करीत एका आरोपीला अटक केली असून, पुन्हा संशयितांचा शोध सुरू आहे.

मारेगाव तालुक्‍यातील वनपरिक्षेत्रापैकी मार्डीजवळील फिस्की मोठे क्षेत्र आहे. या जंगलातील मच्छिंद्रा या गावाजवळ 24 जून रोजी सकाळच्या सुमारास शिकार झाल्याची माहिती मिळताच वनविभागाचे बिट वनरक्षक आर. यू. पारधी यांनी सहकाऱ्यांसोबत जाऊन पाहणी केली असता त्यांना मच्छिंद्रा गावाजवळ असलेल्या कक्ष क्र.2 च्या शेताजवळ चिंचाळा येथील कान्होबा परमेश्वर खंडरे याचा भ्रमणध्वनी, सुरी, कुऱ्हाड व रिकामा टिफिन आढळला.

शिकार झालेल्या प्राण्याचा शोध सुरू असताना मुसळधार पावसामुळे अडथळा येत असल्याने त्यांचा शोध पूर्ण झाला नाही. दुसऱ्या दिवशी पुन्हा शोध घेतला असता कक्ष क्र.दोनच्या शेताजवळ शिकार केलेल्या वन्यप्राण्यांचे तुकडे दिसले. यावरून सदर व्यक्‍तीवर वन्यजीव संरक्षक अधिनियम 1972 चे कलम 9, 39 ,R/W51 अन्वये वनगुन्हा दाखल करण्यात आला.

अवश्य वाचा- नातेच उठले जीवावर, शेतीच्या वादातून नातवानेच केली आजीची हत्या

आरोपी कान्होबा खंडरे याला अटक करण्यात आली असून, या शिकारीत पुन्हा कोणाचा सहभाग आहे, याप्रकरणी वनविभाग शोध घेत आहे. या प्रकरणाचा तपास उपवनसंरक्षक पांढरकवडा के. एम. अभर्णा, सहाय्य्क वनसंरक्षक पांढरकवडा यांच्या मार्गदर्शनात वनपरिक्षेत्र अधिकारी विक्रांत खाडे, क्षेत्र सहाय्यक एन. के. आकुलवार, बीट वनसंरक्षक आर. यू. पारधी, व्ही. डी. बडे करीत आहेत.

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Chital hunting in the forest near Mardi