

सिंदेवाही : तालुक्यातील नवरगाव येथे बुधवार (ता. १९) सकाळी सात वाजताच्या सुमारास चितळ शिरले. वनविभागाला याची माहिती देण्यात आली. वनकर्मचाऱ्यांचे पथक गावात दाखल झाले. त्यांनी चितळाला पकडले. वैद्यकीय तपासणी करून त्याला निसर्गमुक्त केले. विशेष म्हणजे काही दिवसांआधीच नवरगावाला लागून असलेल्या धुम्मनखेडा गावात बिबट शिरला होता. त्याने काहींना जखमीही केले होते. उन्हाळा लागताच जंगलातील पाणीसाठा आटू लागला आहे. त्यामुळे पाण्याच्या शोधात वन्यप्राणी गावाकडे कूच करू लागले आहे.