धक्कादायक! चॉकलेट देण्याच्या बहाण्याने तिला घरात बोलवले अन्...

सकाळ वृत्तसेवा
Friday, 10 April 2020

कुणालाही काही सांगितल्यास तुला व तुझ्या परिवारास जिवानिशी ठार मारण्याची धमकी दिली. त्या दोघा आरोपीविरुध्द पीडितेने शहर पोलिस स्टेशनला तक्रार दिली आहे.

मलकापूर (जि.बुलडाणा) : चॉकलेट घेऊन देण्याच्या व मुलगा रडतो आहे, त्याला सांभाळण्याच्या बहाण्याने घरात बोलावून एका 14 वर्षीय मुलीवर अत्याचार केल्याची घटना उघडकीस आली.

शहरातील रमाईनगर (सालीपुरा) भागातील किसन सोनोने (वय 55), अमोल वानखेडे (वय 35) यांनी त्यांच्या शेजारी राहणाऱ्या 14 वर्षीय अल्पवयीन मुलीवर चॉकलेट घेऊन देण्याच्या व मुलगा रडतो आहे, त्याला सांभाळण्याच्या बहाण्याने घरात बोलावून अत्याचार केला. याविषयी कुणालाही काही सांगितल्यास तुला व तुझ्या परिवारास जिवानिशी ठार मारण्याची धमकी दिली. या प्रकरणानंतर ती 14 वर्षीय पीडिता चार महिन्यांची गर्भवती राहिली असून, त्या दोघा आरोपीविरुध्द पीडितेने शहर पोलिस स्टेशनला तक्रार दिली आहे.

महत्त्वाची बातमी : लग्न लावून देतो म्हणतं यवतमाळच्या तरुणीला बोलावले बुलडाण्यात अन् घडले असे...

बाल लैंगिक शोषण अपराध कायद्यान्वये गुन्हा दाखल
शहर पोलिसांनी किसन सोनोने व अमोल वानखेडे या दोघांविरोधात बालकांचे लैंगिक शोषण अपराध कायद्यान्वये गुन्हा दाखल केला आहे. याप्रकरणी दोघा आरोपींना शहर पोलिसांनी अटक केली असून, पुढील तपास शहर पोलिस उपनिरीक्षक गणेश शिंदे करीत आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Chocolate giving excuses called her into the house in malkapur