Video : विलगीकरणातील नागरिकांना ग्राम पंचायत प्रशासनाने जोडले हात; कारण वाचून बसेल धक्का...

सकाळ वृत्तसेवा
Tuesday, 5 May 2020

आम्ही इथेच राहतो. मात्र, जेवणात मटण, खोलीत कुलर आणि जिवनाची हमी द्या, अशा अटी ग्रामपंचायत समोर ठेवली. या अटींची पूर्तता करण्यास ग्रामपंचायतने असमर्थता दर्शविली आणि मजूर आपल्या घरी रवाना झाले. हा प्रकार गोंडपिपरी तालुक्‍यातील सोमनपल्ली येथे घडला. मजुरांना त्यांच्या राहत्या घरीच विलगीकरण करण्यात आले आहे. 

धाबा (जि. चंद्रपूर) : देशात कोरोना आला अन्‌ लॉकडाउन सुरू झाले. लॉकडाउनमुळे नागरिक जेथे होते तिथेच अडकले आहेत. घराबाहेर निघण्यास मनाई केल्याने आपल्या गावी परत जाण्याचा प्रश्‍नच येत नाही. मात्र, गरीब व मजूर वर्ग पायदळ आपल्या गावी जाण्यासाठी निघाले होते. त्यांना वाटेत नागरिक व सामाजिक कार्यकर्त्यांनी मदत केली. अशेच काही मजूर तेलंगाणातून चंद्रपूर जिल्ह्याच्या सिमेवर पोहोचले. याची माहिती मिळताच त्यांना खासगी शाळेत विलगीकरणासाठी ठेवण्यात आले. मात्र, त्यांच्या मागणीपुढे ग्राम पंचायत प्रशासनाने चक्‍क हात जोडले... 

लॉकडाउनमुळे वैतागलेले नागरिक कोणतेही साधन नसल्याने पायदळ आपल्या घरी जाण्यासाठी निघाले. कोणी पाचशे तर कोणी आठशे किमीचा प्रवास करीत पोहोचले. अनेकांचे जवळचे पैसे संपल्याने हा निर्णय घ्यावा लागला तर अनेकांनी निव्वळ घरी जायचेच या विचारातून पायी प्रवास केला. त्यांची परिस्थिती पाहून अनेकांनी त्यांना मदत केली. पिण्याचे पाणी आणि जेवण दिले. कसे तरी हे लोक जिल्ह्यात पोहोचले. मात्र, चंद्रपुरात भलताच प्रकार समोर आला आहे.

जाणून घ्या - चल, पेट्रोल घेऊन येऊ... असे म्हणत नेले झुडपात; मग घडला हा प्रकार

चंद्रपूर जिल्ह्यातील मजूर तेलंगाणातून पायपीट करीत सिमेवर पोहोचले. याची माहिती मिळताच त्यांना खासगी शाळेत विलगीकरणासाठी ठेवले. आम्हाला घरी जाऊ द्या, अशी मागणी त्यांनी ग्राम पंचायत प्रशासनाला केली. मात्र, त्यांनी नकार दिला. डोळ्यांसमोर घर दिसते, मात्र जाता येत नाही म्हणून त्यांनी नवीनच शक्‍कल लढवली.

आम्ही इथेच राहतो. मात्र, जेवणात मटण, खोलीत कुलर आणि जिवनाची हमी द्या, अशा अटी ग्रामपंचायत समोर ठेवली. या अटींची पूर्तता करण्यास ग्रामपंचायतने असमर्थता दर्शविली आणि मजूर आपल्या घरी रवाना झाले. हा प्रकार गोंडपिपरी तालुक्‍यातील सोमनपल्ली येथे घडला. मजुरांना त्यांच्या राहत्या घरीच विलगीकरण करण्यात आले आहे. 

दीड महिन्यानी आले गावात

तेलंगाणात मिरची तोडण्यासाठी महाराष्ट्रातून हजारो मजूर गेलेत. त्यात गोंडपिपरी तालुक्‍यातील शेकडो मजुरांचा समावेश होता. दीड महिन्यानंतर 34 मजुरांनी महाराष्ट्रात पाय ठेवला आहे. मजुरांनी गाव गाठले. मात्र, अद्यापही ते घरापासून दूर आहेत. खबरदारी म्हणून स्थानिक प्रशासनाने गावाबाहेर या मजुरांचे विलगीकरण केले आहे. सुरुवातीला शाळेचा इमारतीत राहण्यास मजुरांनी नकार दिला. मात्र, त्यांची समजूत काढल्यानंतर ते राहण्यास तयार झाले होते.

अधिक माहितीसाठी - अरेरे! काय झाले होते "त्याला', की वृद्‌ध आईलाच निदर्यपणे संपविले...

घरी जाण्यासाठी लढवली ही शक्‍कल

घरी जाण्यासाठी त्यांनी नाटक करायला सुरुवात केली. जेवणात रोज मटण व थंड हवेसाठी खोलीत कुलर हवा आहे. एवढ्यावरच ते थांबले नाहीत. त्यांनी ग्रामपंचायतला जिवाची हमी घ्यायला सांगितले. मजुरांचा या अटी ऐकूण ग्रामपंचायतचे डोके गरगरले. ग्रामपंचायते मजुरांना हात जोडले. अटींची पूर्तता पूर्ण करण्यास असमर्थता दाखविली. अटींची पूर्तता होत नसल्याने मजुरांनी थेट घर गाठले. सध्या हे मजूर स्वगृही असून ग्रामपंचायतने मास्क व साबण दिले आहे. आरोग्य विभागाकडून या मजुरांची नियमित आरोग्य तपासणी सुरू आहे. मजुरांनी लढविलेल्या शक्कलने त्यांना घरी जाण्याची संधी मिळाली. 

मजुरांची आरोग्य तपासणी सुरू 
तेलंगाणातून आलेल्या मजुरांचे शाळा इमारतीत विलगीकरण करण्याचे ठरले होते. मात्र, मजुरांनी जेवणात मटण व कुलरची मागणी केली. मागण्या पूर्ण करणे शक्‍य नव्हते. सध्या मजूर स्वगृही आहेत. त्यांची आरोग्य तपासणी सुरू आहे. 
- किरण ईजमणकर, 
सरपंच, सोमनपल्ली


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Citizens demand mutton in Chandrapur district