Buldhana News: पिंपळखुटा खुर्दमध्ये विद्युत खांब हटविण्यावरून दोन गटात लोखंडी रॉडने हाणामारी, आठ जणांविरुद्ध गुन्हा
Electric Pole Dispute: पिंपळखुटा खुर्द येथे विद्युत खांब हटविण्याच्या कारणावरून दोन गटांमध्ये लोखंडी रॉडने हाणामारी झाली. या प्रकरणी बोराखेडी पोलिसांनी आठ जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
मोताळा : विद्युत खांब हटविण्याच्या कारणावरून दोन गटात लोखंडी रॉडने हाणामारी झाल्याची घटना पिंपळखुटा खुर्द येथे मंगळवारी (ता. ५) घडली. या प्रकरणी परस्पर विरोधी तक्रारींवरून बोराखेडी पोलिसांनी दोन्ही गटातील आठ जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.