राज्यातील शाळांमध्ये स्वच्छता पंधरवडा

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 1 सप्टेंबर 2019

अमरावती : राज्यातील सर्व शाळा व शैक्षणिक संस्थांमधून स्वच्छता पंधरवडा राबविण्याच्या सूचना महाराष्ट्र शैक्षणिक नियोजन व प्रशासन संस्थेने दिल्या आहेत. 1 ते 15 सप्टेंबर या कालावधित हा कार्यक्रम राबविण्यात येणार आहे. सर्वोत्कृष्ट कार्यक्रमाचे सादरीकरण करणाऱ्या मुख्याध्यापकांना पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे.

या पंधरवड्यात विद्यार्थी, शिक्षक व समाज यांचा सक्रिय सहभाग घेऊन साफसफाई, स्वच्छता व आरोग्य आणि शाळेतील इतर उपक्रमांचा समावेश करण्यात येणार आहे. यासाठी सर्व शाळेतील शिक्षक, कर्मचारी व विद्यार्थ्याना स्वच्छतेची शपथ देणे, पंधरवड्याच्या पहिल्या आठवड्यात शालेय व्यवस्थापन समिती, पालक-शिक्षक संघ तसेच पालक व शिक्षक यांच्या बैठका घेणे, त्यांना स्वच्छता व आरोग्याचे महत्त्व पटवून देण्यासोबतच त्यासाठी प्रोत्साहित करणे, शिक्षकांनी शाळेतील किंवा संस्थेतील स्वच्छताविषयक सुविधांची तपासणी करून त्याची देखभाल व दुरुस्तीचा कार्यक्रम आखणे, जिल्हा गट व केंद्र स्तरावर स्वच्छतागृह तसेच शालेय परिसर याविषयी स्पर्धांचे आयोजन करावे, विद्यार्थ्यांसाठी निबंधस्पर्धा, प्रश्‍नमंजूषा अशा स्पर्धांचे आयोजन करावे, विद्यार्थी, पालक व शिक्षकांकरिता चित्रकला स्पर्धा आयोजित करणे, स्वच्छतेवर वादविवाद स्पर्धांचे आयोजन करणे, शाळा व शैक्षणिक संस्था यांनी त्यांच्या संकेतस्थळावर स्वच्छतेच्या जागृतीचे संदेश अपलोड करावेत, अशा सूचनांचा समावेश आहे.

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Cleaning fortnightly in schools across the state