
CM Devendra Fadnavis
sakal
अमरावती : कार्यकर्त्यांची स्वबळावर निवडणूक लढण्याची नेहमीच इच्छा असते. परंतु, त्या-त्या ठिकाणच्या परिस्थितीचा विचार करून निर्णय घ्यायचा असतो. सर्वांना निवडणूक लढता यावी यासाठी असे निर्णय घेता येत नाहीत. त्यामुळे जिथे शक्य आहे तिथे युती होईल. जिथे शक्य नसेल तिथे समोरासमोर लढू, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज स्पष्ट केले.