गडचिरोली - महाराष्ट्रात अनेक मुख्यमंत्री झाले पण गडचिरोली जिल्ह्यात सर्वाधिक फिरणारा मी एकमेव मुख्यमंत्री आहे, असे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना शुक्रवारी केले..भामरागड तालुक्यातील राज्याच्या शेवटच्या टोकाला छत्तीसगड राज्याच्या सीमेवर कवंडे या अतिदुर्गम आणि नक्षलग्रस्त आदिवासी भागात आयोजित लाभार्थी मेळाव्यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, सहपालकमंत्री आशीष जयस्वाल, जिल्हाधिकारी अविश्यांत पंडा आदी प्रामुख्याने उपस्थित होते. या अतिदुर्गम आणि नक्षलप्रभावित भागात जाणारे फडणवीस राज्याचे पहिले मुख्यमंत्री ठरले..त्यांनी कवंडे तपासणी नाक्याला भेट दिली आणि गावकऱ्यांशी संवाद साधला. महाराष्ट्रातील नक्षलप्रभावित जिल्हा म्हणून ओळख असलेल्या गडचिरोली जिल्ह्याचे पालकमंत्रिपद फडणवीस यांनी स्वीकारले आहे..गडचिरोलीत माझ्या एवढा फिरलेला मुख्यमंत्री दुसरा कोणीच नाही, असे म्हणत मुख्यमंत्री फडणवीस यांनी गडचिरोली जिल्ह्यातील नक्षलवादी भागात आपण स्वत: शेवटच्या टोकापर्यंत दौरे केल्याचे सांगितले.फडणवीस म्हणाले, की पोलिस दलाने अवघ्या २४ तासांत कवंडे तपासणी नाका निर्माण केला. पोलिस दलाने गेल्या दीड वर्षांत २८ नक्षलवाद्यांना मारले, ३१ नक्षलवाद्यांना अटक झाली, तर ४४ नक्षलवाद्यांनी शरणागती पत्करली. हा एक विक्रम आहे. अनेक नक्षलवादी सामान्य जीवनाची वाट धरत आहेत..मुख्यमंत्र्यांपुढे १२ नक्षलवाद्यांची शरणागतीमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत आज कोट्यवधींचे बक्षीस असलेल्या १२ नक्षलवाद्यांनी शस्त्रांसह शरणागती पत्करली. राज्यात नक्षलवाद्यांनी शस्त्रांसह शरणागती पत्करण्याची अशा प्रकारची ही पहिलीच घटना आहे..यापूर्वी शरणागती पत्करलेल्या १३ पूर्वाश्रमीच्या नक्षलवाद्यांचा सामूहिक विवाह सोहळाही गडचिरोलीत आयोजित करण्यात आला होता, त्याला हजेरी लावत त्यांनी नवदाम्पत्यांना नवजीवनाच्या शुभेच्छा दिल्या..सकाळ+ चे सदस्य व्हा ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.