
अमरावती : संपूर्ण राज्यात चर्चेचा विषय ठरलेल्या नवीन सरकारचा बहूप्रतीक्षित शपथग्रहण सोहळा शुक्रवारी (ता. पाच) मुंबईत पार पडला. राज्याच्या मुख्यमंत्रिपदी तिसऱ्यांदा शपथ ग्रहण करणाऱ्या देवेंद्र फडणवीस यांच्या निवडीनंतर त्यांचे अमरावतीकर मामा तसेच कलोती कुटुंबीयांनी जुन्या आठवणींना उजाळा दिला. सीएम पदासाठी देवाभाऊंचे नाव निश्चित होताच अमरावतीच्या बालाजी प्लॉट परिसरात एकच जल्लोष साजरा करण्यात आला.