
महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पुन्हा एकदा राज्याचे कृषीमंत्री माणिकराव कोकाटे यांचे कान टोचले आहेत. कोकाटे यांच्या शेतकऱ्यांबाबतच्या आक्षेपार्ह वक्तव्यावर मुख्यमंत्र्यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. शासनाला भिकारी संबोधणाऱ्या कोकाटे यांच्या वक्तव्यामुळे निर्माण झालेल्या वादानंतर फडणवीस यांनी स्पष्ट शब्दांत त्यांना फटकारले आहे. “मंत्र्यांनी अशी वक्तव्ये करणे चुकीचे आहे,” असे फडणवीस म्हणाले.