भाग्यश्रीचं वारली पेंटिंगमधून रामायण दर्शन पोहोचलं मुख्यमंत्र्यांपर्यंत; दिली कौतुकाची थाप | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

भाग्यश्रीचं वारली पेंटिंगमधून रामायण दर्शन पोहोचलं मुख्यमंत्र्यांपर्यंत; दिली कौतुकाची थाप

भाग्यश्रीचं वारली पेंटिंगमधून रामायण दर्शन पोहोचलं मुख्यमंत्र्यांपर्यंत; दिली कौतुकाची थाप

अमरावती : कोरोना लॉकडाउनच्या (Corona Lockdown) काळात मिळालेल्या वेळेचा सदूपयोग करून अमरावतीच्या (Amravati) भाग्यश्री पटवर्धन यांनी घराच्या संरक्षण भिंतीवर वारली चित्रकलेतून (Warli Paintings) साकारलेल्या रामायणाचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी कौतुक केले आहे. शनिवारी सायंकाळी मुख्यमंत्री (CM Udhhav Thackeray) आणि भाग्यश्रीमध्ये जवळपास 10 मिनिटांचा संवाद झाला. वारली चित्रकला केवळ घराच्या भिंतीपुरती मर्यादित न ठेवता ती पुस्तकाच्या स्वरूपात प्रकाशित करावी, असे मुख्यमंत्र्यांनी सुचविल्याचे भाग्यश्री यांनी सांगितले. (CM Udhhav Thackeray praised young artist from Amravati)

हेही वाचा: सावधान! सोशल मीडियावर लहान मुलांचे 'हे' फोटो चुकूनही करू नका शेअर; अन्यथा...

रामायणाप्रमाणेच विविध भारतीय सणांचे चैतन्य आणि दिव्यत्व वारली चित्रांच्या माध्यमातून चित्रित करून त्याचे एक चांगले पुस्तक प्रकाशित करता येऊ शकेल, असे मुख्यमंत्र्यांनी आपल्याला सांगितल्याचे भाग्यश्री पटवर्धन म्हणाल्या.

शहरातील ट्रॅव्हल्स फोटोग्राफर असलेल्या भाग्यश्री पटवर्धन या चित्रकारसुद्धा आहेत. सध्या कोरोनामुळे टूरिझम क्षेत्र बंदच आहे. अशावेळी लॉकडाउनचा सदूपयोग करीत भाग्यश्री पटवर्धन यांनी आपल्या घराच्या संरक्षण भिंतीवर वारली चित्रकलेच्या माध्यमातून रामायणातील विविध प्रसंगी साकारले आहे. वृत्तपत्र तसेच सोशल मीडियावरून भाग्यश्रीच्या कलागुणांचे प्रसारण झाल्यानंतर मुख्यमंत्र्यांनी तिच्या कलेचे कौतुक केले. तिने श्रीराम जन्म, जटायूचे रावणासोबत युद्ध, सीता स्वयंवर, रामसेतूची बांधणी, राम-रावण युद्ध असे अनेक प्रसंग साकरले आहेत.

हेही वाचा: नागरिकांनो लॉकडाऊनमध्ये घराबाहेर पडताना सावधान; चौकाचौकात पोलिसांचा कडक बंदोबस्त

आपल्या चित्रकलेची दखल स्वतः मुख्यमंत्री घेतील, असे वाटलेही नव्हते. मुख्यमंत्री स्वतः उत्तम फोटोग्राफर आहेत, त्यांनी काढलेले गडकिल्ल्यांचे आणि वन्यजीवांचे फोटो मी स्वतः पाहिले आहेत. मात्र आपल्यासारख्या सर्वसामान्य कलाकाराला ते स्वतः फोन करतील, असे कधीच वाटले नव्हते.
-भाग्यश्री पटवर्धन, अमरावती.

(CM Udhhav Thackeray praised young artist from Amravati)

Web Title: Cm Udhhav Thackeray Praised Young Artist From

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
टॅग्स :Amravati
go to top