esakal | सहकारनेते उगले यांना पेटविण्याचा प्रयत्न : आरोपीस अटक
sakal

बोलून बातमी शोधा

file photo

सहकारनेते उगले यांना पेटविण्याचा प्रयत्न : आरोपीस अटक

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

धामणगावरेल्वे (जि. अमरावती) : जिल्ह्यातील सहकारनेते व आदर्श यशवंत ग्रामपंचायत झाडाचे शिल्पकार विजय उगले यांना पेट्रोल टाकून जिवंत पेटविण्याचा प्रयत्न करणाऱ्या आरोपीला घटनेच्या दोन दिवसांनंतर अटक करण्यात आली. ही कारवाई मंगरूळ दस्तगीर पोलिसांनी मंगळवारी (ता. 3) केली.
शनिवारी (ता.31) कामानिमित्त सहकारनेते उगले व त्यांचा वाहनचालक सुनील ठाकरे हे चिंचोली येथे विलास जाधव यांच्या घरी भेटण्याकरिता गेले होते. दरम्यान जाधव यांच्या घरासमोर गाडीमधून उतरताच संशयित आरोपी शेख शब्बीर शेख रहीम (रा. झाडा) ऑटो घेऊन आला होता. त्याने दोन लिटरच्या बाटल्यांमधील पेट्रोल उगलेंच्या अंगावर फेकले. त्यामुळे त्यांच्या डोक्‍यावर व तोंडावर पेट्रोल पडून त्यांचे कपडेसुद्धा भिजले होते. त्यानंतर संशयित आरोपीने आगपेटीच्या काड्या पेटवून उगले यांच्या अंगावर फेकण्याचा प्रयत्न केला होता.

loading image
go to top