Cotton Damage : कोळशाच्या धुळीने काळवंडला कापूस....उत्पादनात झाली प्रचंड घट; वणीतील शेतकरी रडकुंडीला
Coal dust destroying cotton crops : वणीतील कोळसा खाणींच्या प्रदूषणामुळे कापसाचे उत्पादन घटले आहे आणि शेतकऱ्यांना मोठ्या नुकसानीचा सामना करावा लागत आहे. शेतकऱ्यांनी वेकोलि कंपनीकडून नुकसानभरपाईची मागणी केली आहे.
वणी (जि. यवतमाळ) : वणी तालुक्यात वेकोलिचा पसारा सर्वत्र वाढला आहे. मात्र, याच वेकोलिच्या खाणी शेतकऱ्यांना मारक ठरत आहे. कोळसा वाहतूक ही मानवासह पशुपक्षांनाही घातक ठरत आहे.