Harshwardhan Sapkal : समाजातील सर्व घटकांना सोबत घेवून परिवर्तनासाठी प्रयत्न करणार

छत्रपती शिवाजी महाराज यांचे आजोळ व राष्ट्रमाता माँ जिजाऊ यांच्या जन्मस्थळाला हर्षवर्धन सपकाळ यांनी भेट देऊन जिजाऊ माँ साहेब यांना अभिवादन केले.
Harshwardhan Sapkal
Harshwardhan Sapkalsakal
Updated on

सिंदखेड राजा - समाजातील सर्व घटकांना सोबत घेऊनच परिवर्तनासाठी प्रयत्न करणार असल्याचे महाराष्ट्र काँग्रेस कमिटीचे नवनिर्वाचित प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी बोलताना सांगितले आहे. राष्ट्रमाता राजमाता माँ जिजाऊ यांना अभिवादन करण्यासाठी ता.१५ फेब्रुवारी रोजी नवनिर्वाचित प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ हे मातृतीर्थ सिंदखेड राजा मध्ये आले होते.

काँग्रेस प्रदेशाध्यक्षाचा पदभार स्वीकारण्याच्या अगोदर राष्ट्रमाता माँ जिजाऊ यांच्या चरणावर नतमस्तक झाल्याशिवाय प्रदेश अध्यक्ष पदाच्या खुर्चीवर बसू शकत नव्हतो, त्यामुळेच मातृतीर्थ सिंदखेड राजा मध्ये नतमस्तक होण्यासाठी आलो असल्यांचे त्यांनी सांगितले आहे.

छत्रपती शिवाजी महाराज यांचे आजोळ व राष्ट्रमाता माँ जिजाऊ यांच्या जन्मस्थळाला भेट देऊन जिजाऊ माँ साहेब यांना अभिवादन केले. राज्यातील शेतकरी, कष्टकरी,कामगार आणि सर्व सामाजिक घटकांना अपेक्षित सुराज्य निर्माण करण्यासाठी लढण्याचं बळ मिळो, अशी प्रार्थना जिजाऊंच्या चरणी हर्षवर्धन सपकाळ यांनी केली आहे.

मातृतिर्थासोबत मागील ३० वर्षापासून नाळ जुळली आहे,माँ.जिजाऊ यांचा जन्म सोहळा बॅ. ए. आर. अंतुले हे मुख्यमंत्री असताना शासकीय पातळीवरून साजरा केला गेला होता. मात्र तदनंतर सदर जन्मोत्सव हा स्थानिक पातळीवर पंचक्रोशीतील नागरिकांच्या वतीने साजरा केला जात असे.

मात्र हर्षवर्धन सपकाळ हे जिल्हा परिषद अध्यक्ष झाल्यानंतर त्यांनी पुढाकार घेऊन जिल्हा परिषदेच्या वतीने दरवर्षी जिजाऊ जन्मोत्सव सोहळा आयोजन करण्यासाठी पुढाकार घेतला होता. त्यानंतर सदर जन्मोत्सव हा नियमितरीत्या दरवर्षी जिल्हा परिषदेच्या वतीने साजरा होतो, जिजाऊ जन्मोत्सव सोहळ्याचे संपूर्ण महाराष्ट्रात लोकोत्सवात रूपांतर झाल्याचे पहायला मिळते.

यावेळी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस शाम उमाळकर, जिल्हा काँग्रेस कमिटीचे उपाध्यक्ष रमेश कायंदे, वंशज शिवाजी राजे जाधव, तालुका काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष शिवदास रिंढे, दत्ता काकास, लोकजागर परिवाराचे मुख्य विश्वस्त प्रवीण गीते, अशोकराव पडघान, सत्यजित खरात, समाधान सुपेकर, सुनील जायभाये, अनिकेत मापारी, कलीम खान, पि. के. वाघमारे, जुनेद अली, अमोल ठाकरे, राजू देशमुख, उल्हास भुसारी, राहुल साबळे, सिद्धार्थ बेंदाडे, यांच्यासह आदी पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

आघाडी मधील बिघाडी दुरुस्त करणार -

आघाडी मधील बिघाडी दुरुस्त करण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे नवनिर्वाचित प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी यावेळी बोलताना सांगितले आहे. आघाड्यांचा अपरिहार्यता सुरू झाल्यामुळे आघाडीच्या खेळामध्ये काँग्रेसचे कुठेतरी बिघाडी झाली आहे हे कडू सत्य आहे.

येणाऱ्या काळामध्ये बिघाडी दुरुस्ती कशी करता येईल यासाठी काम करणार आहे. जिल्ह्यामध्ये ज्यावेळी मी जिल्हा परिषद अध्यक्ष होतो, त्यावेळी १० जिल्हा परिषद सदस्य काँग्रेसचे सोबत होते परत एकदा जुने दिवस या ठिकाणी आणायचे आहे. सर्वांची मोट बांधून परिवर्तनाचा निश्चित प्रयत्न करणार असल्याचे यावेळी त्यांनी सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com