

Soybean
यवतमाळ - निकृष्ट सोयाबीन बियाण्यांमुळे हजारो शेतकर्यांचे नुकसान झाल्याचे चित्र समोर आल्यानंतर जिल्हा प्रशासन अॅक्शन मोडमध्ये आले आहे. जिल्हाभरातून तीन हजारांहून अधिक तक्रारी प्राप्त झाल्या असून 2 हजार 962 हेक्टर क्षेत्रावरील सोयाबीन पिकाची उगवण न झाल्याचे प्राथमिक तपासणीत स्पष्ट झाले आहे. या प्रकरणात संबंधित कंपन्यांविरुद्ध विविध ठिकाणी गुन्हे दाखल करण्यात आले असून दोषी कंपन्यांना वाचविले जाणार नाही, असा स्पष्ट इशारा प्रशासनाने दिला आहे.