जिल्हाधिकारी निघाले आमच्याच गावचे !

 मौदा ः जिल्हाधिकारी रवींद्र ठाकरे हे गावात आल्यानंतर त्यांच्याशी भेट घेताना तहसील कार्यालयाचे अधिकारी व इतर.
मौदा ः जिल्हाधिकारी रवींद्र ठाकरे हे गावात आल्यानंतर त्यांच्याशी भेट घेताना तहसील कार्यालयाचे अधिकारी व इतर.

मौदा (जि.नागपूर) ः वेळ सकाळची साडे नऊची. जिल्हाधिकारी रवींद्र ठाकरे मौद्यात पोहोचले. उपविभागीय कार्यालय, तहसील कार्यालय व नगरपंचायतीला भेट देऊन तेथील समस्या जाणून आढावा घेतल्या आणि क्षणभर उसंत मिळाल्यानंतर त्यांना मौदा शहराशी असलेले जुने ऋणानुबंध आठवले. या निमित्ताने गावकरी खुश झाले.

जिल्हाधिकाऱ्यांचा गावक-यांना सल्ला
मौदा येथील जनता हायस्कूल शाळेत जिल्हाधिकारी रवींद्र ठाकरे यांचे शिक्षण झाले. त्यानंतर ते तहसील कार्यालयात 1995-96 ला तहसीलदार म्हणून कार्यरत होते. त्यामुळे या गावाशी जुने ऋणानुबंध असल्याचे जिल्हाधिकारी ठाकरे यांनी जुन्या आठवणीत रमले.मौदा नगरपंचायत स्वच्छ आहेच, परंतु काही काम सुरू असताना स्वच्छता ठेवा, सर्व मिळून पर्यावरणाला वाचवा. दिल्लीला पर्यावरणाचा फटका बसत आहे. त्यामुळे आपण आपल्या वारसांना संपती देतो, त्याचप्रमाणे पर्यावरणसुद्धा द्या. आजूबाजूचा परिसर स्वच्छ ठेवा पर्यावरण बिघडू देऊ नका, असे जिल्हाधिकाऱ्यांनी सल्ला दिला.

जुन्या ओळखीच्या लोकांची काढली आठवण
मौदा येथे तहसीलदार असताना त्यांच्या गाडीचे चालक रामचंद्र मोडकू रोडे यांनी भेट घेतली. आपल्या समस्या सांगितल्या. त्यावेळचे सरपंच बुराडे व शिक्षक तिजारे यांचीसुद्धा आठवण केली. काही लोकांसोबत फोन करून त्यांच्या सोबत बोलले.
तहसील कर्यालयात सर्व विभागाच्या कर्मचाऱ्यांना बोलावून त्यांच्याकडून विचारपूस केली. त्याचप्रमाणे नगरपंचायत येथील कामाचा आढावा घेतला. जुन्या प्राथमिक आरोग्य केंद्राच्या जागेवर नगरपंचायत भवनाकरिता जागा, पट्‌टे वाटपाकरिता जंगली झुडपाची जागा, याबद्दल न्यायालयात खटला सुरू आहे. याचा निकाल लागताच पट्‌टे वाटप करण्यात येईल, अशा काही समस्या सांगितले. त्यावर लवकरात लवकर तोडगा निघेल, असे आश्‍वासन दिले.

यावेळी अतिरिक्‍त जिल्हाधिकारी श्रीकांत फडके, उपविभागीय अधिकारी श्‍याम मदतनूरकर, जिल्हा प्रशासन अधिकारी टाकळखेडे, तहसीलदार प्रशांत सांगडे, नगरपंचायतीचे मुख्याधिकारी रमाकांत डाके, नगराध्यक्ष भारती सोमनाथे, नायब तहसीलदार दिनेश निंबाळकर, अनिकेत पाटील, एन. टी. नंदेश्वर सर्व नगरसेवक उपविभागीय कार्यालय तहसील कार्यालय व नगरपंचायतीचे सर्व कर्मचारी उपस्थित होते.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com