esakal | मंत्री येती घरा, वाहनधारकांच्या डोक्‍याला ताप 
sakal

बोलून बातमी शोधा

file photo

मंत्र्यांचा दौरा असल्यास सुरक्षेच्या कारणावरून नेहमीच तगडा पोलिस बंदोबस्त ठेवण्यात येतो. कॉंग्रेस कमिटीतर्फे आयोजित सत्कार समारंभासाठी शहरात मंत्र्यांची मांदियाळी बघायला मिळाली. सुरक्षेत कोणतीही बाधा निर्माण होऊ नये, यासाठी वाहतूक पोलिसांची सकाळपासून ड्यूटी लावण्यात आली होती.

मंत्री येती घरा, वाहनधारकांच्या डोक्‍याला ताप 

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

यवतमाळ, : शहरात सत्कार समारंभ व कार्यकर्ता मेळाव्यासाठी आलेल्या मंत्र्यांमुळे वाहनधारकांच्या डोक्‍याला ताप सहन करावा लागला. महाविकास आघाडी सरकारमधील एक मंत्री पदाधिकाऱ्याच्या घरी सदिच्छा भेट देण्यासाठी गेल्या. याच कालावधीत एसबीआय चौकात अर्धा तास विनाकारण वाहतूक थांबविण्यात आल्याने नागरिकांनी संताप व्यक्त केला.

हे वाचा—निवडणुकीत मी पुन्हा येईन म्हणाल्यामुळे फडणवीस अडचणीत?

 वाहतूक शाखेच्या कर्मचाऱ्यांशी वाद

मंत्र्यांचा दौरा असल्यास सुरक्षेच्या कारणावरून नेहमीच तगडा पोलिस बंदोबस्त ठेवण्यात येतो. कॉंग्रेस कमिटीतर्फे आयोजित सत्कार समारंभासाठी शहरात मंत्र्यांची मांदियाळी बघायला मिळाली. सुरक्षेत कोणतीही बाधा निर्माण होऊ नये, यासाठी वाहतूक पोलिसांची सकाळपासून ड्यूटी लावण्यात आली होती. नेहमी वाहतूक विस्कळीत राहणाऱ्या मार्गावर वाहतूक शाखेचे पोलिस तैनात करण्यात आले होते. त्यामुळे बेशिस्त मार्गावरही शिस्त दिसून आली. दुपारी एक वाजता एका मंत्र्यांनी कॉग्रेस पदाधिकाऱ्यांच्या घरी सदिच्छा भेट दिली. यावेळी बसस्थानक चौक ते स्टेट बॅंक चौकातील वाहतूक थांबवून ठेवण्यात आली होती. अर्धातासाचा थांबा वाहनधारकांना मिळाल्याने काहींनी संताप व्यक्त केला. उशीर होत असल्याने काहींनी जबरदस्तीने वाहन काढण्याचा प्रयत्न केला. वाहतूक पोलिसांनी वाहन पुढे नेण्यास मनाई केल्याने वादही झाला. मंत्री कार्यकर्त्यांच्या घरी येत असताना सामान्य नागरिकांना वेठीस धरणे योग्य नाही, अशी प्रतिक्रियादेखील वाहनधारकांनी नोंदविली. आजच्या एकूणच वाहतूक व्यवस्थेबद्दल वाहनधारकांनी उपहासात्मक ताशेरेदेखील ओढले. 

प्रवासी वाहनांना शिस्त

आर्णी मार्गावरील जिल्हा परिषदेसमोर आणि दारव्हा मार्गावरील बसस्थानक चौकात खासगी प्रवासी वाहनांची जत्रा नेहमीच बघायला मिळते. आज मात्र, वाहतूक शाखेने खासगी प्रवासी वाहनचालकांना शिस्तीचा डोस दिल्याचे चित्र बघावयास मिळाले.

आज शहरात आलेल्या मंत्र्यांना व्हीआयपी झेड प्लस सुरक्षा आहे. त्यांच्या सुरक्षेत कोणत्याही प्रकारचा अडथळा येऊ नये, यासाठी वाहतूक शाखेकडून खबरदारी घेण्यात आली. मंत्र्यांचा ताफा जात असताना रस्त्यावरील वाहतूक थांबविली जाते. दहा मिनिटांसाठी वाहतूक थांबविण्यात आली होती. त्यामुळे कुणाचीही गैरसोय झाली नाही.
अनिल किनगे, पोलिस निरीक्षक, वाहतूक शाखा, यवतमाळ.

loading image