
‘दिलेल्या तक्रारीचे काय झाले’ अशी विचारणा त्यांनी केली. त्यावेळी ते दारूच्या नशेत होते. त्यामुळे पोलिसांनी त्याला बाहेर बसण्यास सांगितले. दरम्यान, एक पोलिस कर्मचारी ठाण्यात येत असताना राऊत आवारात गळफास लावून बचावासाठी आरडाओरडा करताना दिसला.
सिंदेवाही (जि. चंद्रपूर) : तक्रार देऊनही गुन्हा दाखल न केल्यामुळे त्रस्त झालेल्या व्यक्तीने सिंदेवाही पोलिस ठाण्याच्या आवारात गळफास लावून आत्महत्या केली. बुधवारी ही घटना घडली. मृताचे नाव अशोक राऊत (वय ५५) आहे.
शहरातील दसरा चौकातील रहिवासी अशोक राऊत यांची पत्नी सोडून गेली. त्यामुळे त्यांचे मानसिक स्वास्थ्य बिघडले. मंगळवारी (ता. ५) दारूच्या नशेत राऊत यांनी मामा व मामाच्या मुलाला शिवीगाळ केली. त्यानंतर स्वतःच मामा व मामाच्या मुलाच्या विरोधात पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली. बुधवारी अशोक राऊत पहाटे सिंदेवाही पोलिस ठाण्यात पोहोचले.
विदर्भातल्या ताज्या बातम्यांसाठी क्लिक करा
‘दिलेल्या तक्रारीचे काय झाले’ अशी विचारणा त्यांनी केली. त्यावेळी ते दारूच्या नशेत होते. त्यामुळे पोलिसांनी त्याला बाहेर बसण्यास सांगितले. दरम्यान, एक पोलिस कर्मचारी ठाण्यात येत असताना राऊत आवारात गळफास लावून बचावासाठी आरडाओरडा करताना दिसला. त्याला तातडीने पोलिसांनी उपचारासाठी ग्रामीण रुग्णालय नेले असता डॉक्टरांनी चंद्रपूरला रेफर करण्यापूर्वी तपासणी केली. तोपर्यंत त्यांचा मृत्यू झाला होता.
संपादन - नीलेश डाखोरे