#NagpurWinterSession : शेतकऱ्यांना दिलेले आश्‍वासन पूर्ण करा 

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 17 डिसेंबर 2019

विरोधी पक्षाचे आमदार परिसरात सामनामध्ये प्रकाशित वृत्त "मी तुम्हाला न्याय देण्यासाठी बांध्यावर आलोय' असे बॅनर घेऊन आंदोलन करीत होते. या सरकारला शेतकऱ्यांची चिंता आहे. त्यामुळेच त्यांनी हेक्‍टरी 25 हजार देण्याचे आश्‍वासन दिले होते. आता त्यांचेच सरकार आहे. हीच ती वेळ आहे असे म्हणून दिलेले आश्‍वासन पूर्ण करण्याची मागणी केली.

नागपूर : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शेतकऱ्यांना हेक्‍टरी 25 हजार रुपये देण्याचे आश्‍वासन दिले होते. तसे वृत्तही सामनामध्ये प्रकाशित झाले होते. तेव्हा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिलेले आश्‍वासन पूर्ण करावे, अशी मागणी माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली. हिवाळी अधिवेशनाच्या दुसऱ्या दिवशी भाजपने शेतकरी मुद्दा धरून सरकारला कोंडीत पकडण्यास सुरुवात केली आहे. यासाठी परिसरात आंदोनही केले. 

हिवाळी अधिवेशनाच्या पहिला दिवस स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या मुद्दयावरून चांगलाच गाजला. कामकाज कसे पार पाडावे यासाठी दुसऱ्या दिवशी महाविकास आघाडी बेठक पार पडली. दुसरीकडे विरोधी पक्षाने शेतकरी मुद्दयावरून सरकारला जाब विचारण्यास सुरुवात केली. शेतकऱ्यांना हेक्‍टरी 25 हजार रुपयांची मदत द्या आणि दिलेले आश्‍वासन पूर्ण करा अशी मागणी विरोधी पक्षांच्या आमदरांनी केली. 

अधिक वाचा -  अशोक चव्हाण म्हणतात, राहुल गांधींची भाजपकडून बदनामी
 

विरोधी पक्षाचे आमदार परिसरात सामनामध्ये प्रकाशित वृत्त "मी तुम्हाला न्याय देण्यासाठी बांध्यावर आलोय' असे बॅनर घेऊन आंदोलन करीत होते. या सरकारला शेतकऱ्यांची चिंता आहे. त्यामुळेच त्यांनी हेक्‍टरी 25 हजार देण्याचे आश्‍वासन दिले होते. आता त्यांचेच सरकार आहे. हीच ती वेळ आहे असे म्हणून दिलेले आश्‍वासन पूर्ण करण्याची मागणी केली. एकंदरीत शेतकरी मुद्‌द्‌यावरून सरकारला जाबा विचारण्याचा प्रयत्न विरोधकांचा असल्याचे दिसून आले. 

कामकाज तहकुब

शेतकरी मुद्‌द्‌यावरून विरोधी पक्षनेते व माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सभेत सरकारला जाब विचारण्याला सुरुवात केली. यामुळे सभेज चांगलाच गदारोळ सुरू होता. यावेळी विरोधक चांगलेच आक्रमक झाले होते. अध्यक्ष नाना पटोले यांनी विरोधकांना शांत राहण्याची विनंती केली. मात्र, विरोधक काहीही ऐकण्याच्या स्थितीत नसल्यामुळे त्यांनी सभेचे कामकाज अर्धा तासासाठी तहकुब केले.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Complete the promise