शंभर दिवसांत करा धानखरेदी पूर्ण; अन्यथा आंदोलन करण्याचा शेतकऱ्यांचा इशारा

file photo
file photo
Updated on

भंडारा : पवनी तालुक्‍यातील नऊ आधारभूत धान खरेदी केंद्रात एका महिन्यात अंदाजे १० टक्के धानखरेदी झाली आहे. या संथगतीमुळे सर्व शेतकऱ्यांना धानविक्रीसाठी १० महिने लागू शकतात. मात्र, ३१ मार्चपर्यंत धानखरेदीची मुदत आहे. तेव्हा १०० दिवसांत सर्व धानखरेदी करता यावे याकरिता प्रशासनाने अतिरिक्त केंद्र, बारदाना, गोडाऊन आणि मोजणीची व्यवस्था करून जलद खरेदी सुरू करावी. अन्यथा २८ डिसेंबरला पवनी तहसील कार्यालयावर मोर्चा काढण्याचा व जिल्हा परिषद निवडणुकीवर बहिष्कार टाकण्याचा इशारा शेतकऱ्यांनी दिला आहे.

पवनी तालुक्‍यातील आसगाव, गोसेखुर्द, कोंढा, अड्याळ (चकारा), पवनी, आमगाव, चिचाळ, कोदुर्ली आणि वाही या ठिकाणी आधारभूत धानखरेदी केंद्र सुरू करण्यात आले आहेत. ऑक्‍टोबर महिन्यात केंद्रात खरेदी सुरू करावयाची असताना १५ नोव्हेंबरनंतरच हे केंद्र सुरू झाले आहेत. आतापर्यंत अंदाजे २२ हजार क्विंटल धानखरेदी करण्यात आले आहेत. एकूण झालेल्या उत्पादनाचा विचार करता ही खरेदी केवळ १० टक्के आहे. या संथगतीने धानखरेदी सुरू राहिल्यास सर्व शेतकऱ्यांचा धानखरेदी करण्यास १० महिन्यांचा वेळ लागू शकतो. परंतु, ३१ मार्चपर्यंतच धानखरेदी सुरू करण्यात येणार आहे.

त्यामुळे सर्व शेतकऱ्यांचा धानखरेदी करण्यासाठी प्रशासनाने अतिरिक्त व्यवस्था करण्याची मागणी शेतकऱ्यांकडून करण्यात आली आहे.
आधारभूत खरेदी केंद्रातून टोकण दिलेल्या सर्व शेतकऱ्यांचा धानखरेदी करण्यासाठी तालुक्‍यात आणखी केंद्र वाढविण्यात यावे, बारदान्याचा सतत पुरवठा करण्यात यावा, पवनीत बाजार समितीच्या गोडाऊनमध्ये आधारभूत खरेदी योजनेचे धान साठविण्यास टाळाटाळ केली जात आहे.

गोडाऊनमध्ये त्वरित धानखरेदी सुरू करा

त्याठिकाणी मोजणी करून धान साठविण्यात यावे, बाजार समितीच्या नवीन गोडाऊनमध्ये त्वरित धानखरेदी सुरू करण्यात यावी, तालुक्‍यात बाहेरीत संस्थांना खरेदी सुरू करण्याची परवानगी देण्यात यावी, बहुतेक गोडाऊन भरत आले असल्याने त्वरित भरडाईचे आदेश जारी करण्यात यावे, खरेदी केंद्रात गोडाऊन कमी असल्याने खुल्या आवारात धान मोजण्याची परवानगी देण्यात यावी, प्रत्येक खरेदी केंद्रात वजनकाटे, ग्रेडर, सहायक यांची संख्या वाढविण्यात यावी आदी मागण्यांचे निवेदन १०७ शेतकऱ्यांनी दिले आहे.

आठ दिवसांत मागण्या पूर्ण करा
पवनी तालुक्‍यातील शेतकऱ्यांना यावर्षी धानविक्रीस मोठी अडचण जाणवत आहे. तेव्हा आठ दिवसांत शेतकऱ्यांच्या मागण्या पूर्ण झाल्या नाही तर, २८ डिसेंबरला पवनी तहसील कार्यालयावर मोर्चा काढण्यात येईल. तसेच जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीवर बहिष्कार टाकण्याचा इशारा शेतकऱ्यांनी दिला आहे.
-त्र्यंबकेश्‍वर गिऱ्हेपुंजे
शेतकरी सेवक, मोखारा.

(संपादन  : दुलिराम रहांगडाले)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com