Bharat Jodo Yatra : नक्षलवाद सोडून सीताक्का झाली आमदार | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Bharat Jodo Yatra

Bharat Jodo Yatra : नक्षलवाद सोडून सीताक्का झाली आमदार

शेगाव : घरची परिस्थिती आणि नक्षलवादाचा प्रभाव यातून पती आणि भावांचा नक्षल्यांशी संबंध आला. त्यामुळे नक्षलवादी चळवळीत स्वतःलाही त्यात झोकून दिले. मात्र, मनात गांधीवादाचा विचार असल्याने नक्षलवाद सोडून गांधीवादासोबत जात आमदारकी मिळविली. ही कहाणी वारांगल मुलूगु येथील सीताक्का यांची.

घरची आर्थिक परिस्थिती चांगली नसल्याने सीताक्का यांनी वयाच्या १५ व्या वर्षी नक्षली कारवाईत सहभागी झाल्यात. तब्बल १० ते १५ वर्ष त्या चळवळीत सक्रिय होत्या. त्यांचे पती आणि भाऊही त्यात सहभागी होते.

मुले झाल्यानंतर त्यांची जबाबदारी आणि योग्य शिक्षण आणि समाजात सन्मानाचे स्थान मिळावे यासाठी नक्षलवाद सोडून नियमित जीवन जगण्याचा निर्धार सीताक्कांनी केला. त्यांनतर नक्षल्यांशी संबंध तोडून गांधीवाद मनात ठेवून त्या त्यातून बाहेर पडल्या. त्यानंतर तेलगू देसम पक्षाकडून निवडणूक लढवली. नंतर त्यांनी काँग्रेस पक्षात प्रवेश केला व वारांगल मुलूगु येथून निवडणूक लढवीत विजयी झाल्या.

गरिबांचे खटले

कधीकाळी नक्षलवादी असलेल्या सीताक्का यांनी एल.एल.बी.चे शिक्षण घेतले आहे. वकील बनल्यानंतर त्या स्वतः न्यायालयात गरिबांचे खटले लढतात.