Chandrapur: काँग्रेसची उमेदवारी अग्रवालांच्या गळ्यात?; चंद्रपूर-वर्धा-गडचिरोली स्थानिक स्वराज संस्था मतदार संघ

Congress Leaders Unite Ahead of Local Body Election: चंद्रपूर-वर्धा-गडचिरोली स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघासाठी काँग्रेसकडून शैलेश अग्रवाल यांच्या नावावर शिक्कामोर्तब झाल्याची चर्चा आहे. पक्षातील मतभेद बाजूला ठेवत नेते एकत्र आल्याने राजकीय समीकरणांना वेग आला आहे.
Chandrapur

Chandrapur

esakal

Updated on

चंद्रपूर: चंद्रपूर महानगरपालिकेच्या महापौरपदाच्या निवडणुकीपासून एकमेकांशी संपर्क टाळत असलेल्या जिल्ह्यातील काँग्रेस नेत्यांनी अखेर एकत्र येत चंद्रपूर- वर्धा- गडचिरोली स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघासाठी वर्धा येथील शैलेश अग्रवाल यांच्या नावावर उमेदवार म्हणून शिक्कामोर्तब केले. आधीच भाजपने काँग्रेसच्या नगरसेवकांना मोठ्या संख्येने पर्यटनाला पाठविल्याची चर्चा सुरू आहे. त्या पार्श्वभूमीवर काँग्रेसकडून निवडणूक लढविण्यास नेमका कोण तयार होईल, याबाबत उत्सुकता निर्माण झाली होती. अखेर अग्रवाल यांच्या नावावर शिक्कामोर्तब झाल्याने या चर्चांना पूर्णविराम मिळाला.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com