

Attack on Hidayat Patel
esakal
Akola Crime: अकोट तालुक्यातील मोहाळा येथे काँग्रेसचे माजी जिल्हाध्यक्ष हिदायत पटेल यांच्यावर जुन्या वैमनस्यातून हल्ला झाल्याची धक्कादायक घटना मंगळवारी दुपारी घडली. दुपारी दोनच्या सुमारास झालेल्या या हल्ल्यात ते जखमी झाले असून त्यांच्यावर अकोट येथील खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या घटनेनंतर परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले असून राजकीय वर्तुळातही खळबळ उडाली आहे.