Khamgaon News : काँग्रेसचे माजी आमदार दिलीपकुमार सानंदा यांनी घेतली एकनाथ शिंदे यांची भेट; काँग्रेस सोडणार असल्याची चर्चा

काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षपदी बुलडाण्याचे हर्षवर्धन सपकाळ यांची वर्णी लागल्यानंतर जिल्ह्यातील काँग्रेसचे अनेक नेते पक्षाला सोडचिठ्ठी देत इतर पक्षात प्रवेश करत आहेत.
Dilipkumar Sananda
Dilipkumar Sanandasakal
Updated on

खामगाव - काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षपदी बुलडाण्याचे हर्षवर्धन सपकाळ यांची वर्णी लागल्यानंतर जिल्ह्यातील काँग्रेसचे अनेक नेते पक्षाला सोडचिठ्ठी देत इतर पक्षात प्रवेश करत आहेत. दरम्यान काँग्रेसचा आणखी एक बड्या नेत्याच्या पक्षप्रवेशाच्या चर्चांनी जोर धरला असतानाच खामगाव येथील काँग्रेसचे माजी आमदार, काँग्रेसचे खंदे समर्थक म्हणून ओळख असलेल्या दिलीपकुमार सानंदा यांनी मंगळवारी मुंबई येथे शिवसेनेचे मुख्यनेते, उपमुख्यमंत्री एकनाथराव शिंदे यांची भेट घेतली. यावेळी दोघांमध्ये जवळपास तासभर चर्चा झाल्याची माहिती असून यावेळी बुलडाण्याचे शिवसेनेचे आमदार संजय गायकवाड हे देखील उपस्थित होते.

दिलीपकुमार सानंदा हे खामगाव मतदार संघात सलग १५ वर्ष आमदार राहले आहेत. सन २०१४ मध्ये त्यांना पराभवाचा सामना करावा लागला. विधानसभा निवडणुकीपुर्वी सानंदा हे भाजपच्या वाटेवर असल्याची चर्चा होती. दरम्यान २०२४ मध्ये पुन्हा एकदा त्यांनी काँग्रेसकडून विधानसभा निवडणूक लढवली व पुन्हा एकदा ते पराभूत झाले.

राज्यात महाविकास आघाडीची झालेली वाताहात व राजकीय गणिते पाहता अनेक नेत्यांनी पक्ष बदलण्याचे सत्र अवलंबविले आहे. तर काँग्रेसचे माजी आमदार दिलीपकुमार सानंदा यांच्यासह काँग्रेसचे जिल्ह्यातील काही बडे नेते इतर पक्षात प्रवेश करणार असल्याची चर्चा गेल्या दोन महिन्यांपासून सुरू आहे.

दरम्यान दिलीपकुमार सानंदा यांनी मुंबई येथे मंगळवारी मुंबई येथे शिवसेनेचे मुख्यनेते, उपमुख्यमंत्री एकनाथराव शिंदे यांची भेट घेतली. त्यामुळे पक्षप्रवेशाच्या चर्चांना आणखी जोर आला आहे.

प्रदेशाध्यक्ष सपकाळ यांच्या नियुक्तीमुळे नाराजी

काँग्रेस प्रदेशाध्यक्षपदी बुलडाण्याचे माजी आमदार हर्षवर्धन सपकाळ यांची नियुक्ती झाल्यापासून बुलडाणा जिल्ह्यातील मुकूल वासनिक गट नाराज असल्याची चर्चा आहे. त्यानंतर काही नेत्यांनी काँग्रेसचा राजीनामा देत इतर पक्षात प्रवेश देखील केला असून आणखी काही बडे नेते पक्ष सोडणार असल्याची माहिती आहे.

आधी राष्ट्रवादी अजित पवार गटात जाणार असल्याची होती चर्चा

काँग्रेसचे माजी आमदार दिलीपकुमार सानंदा हे काँग्रेस सोडून राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटात जाणार अशी चर्चा होती. काँग्रेस व राष्ट्रवादीची विचारधारा सारखी असल्याने राष्ट्रवादीच्या पर्यायाची चाचपणी सुरू होती. मात्र आज सानंदा यांनी शिवसेना नेत्याची भेट घेतल्याने नवीन राजकीय चर्चांना जोर आला आहे.

खामगावचे धंगेकर (सानंदा) शिवसेनेच्या वाटेवर?

सोमवारीच पुण्याचे काँग्रेसचे नेते, माजी आमदार रविंद्र धंगेकर यांनी शिवसेना शिंदे गटात प्रवेश केला. दरम्यान पक्षप्रवेशापुर्वी माध्यमांसोबत बोलताना धंगेकर यांनी काँग्रेसने आपल्याला भरभरून दिले मात्र कार्यकर्त्यांची इच्छा लक्षात घेता व कामे व्हावीत यासाठी आपण शिवसेनेते जात असल्याचे म्हटले होते. दरम्यान सानंदा सुध्दा धंगेकर यांच्याप्रमाणे पाऊल टाकतात का हे पहावे लागणार आहे. तर खामगावचे धंगेकरही (सानंदा) शिवसेनेच्या वाटेवर अशी चर्चा आता मतदार संघासह जिल्ह्यात सुरू आहे.

जब तक जिंदा हू, काँग्रेस का परिंदा हु - दिलीपकुमार सानंदा

दरम्यान दिलीपकुमार सानंदा यांची प्रतिक्रिया जाणून घेतली असता, एकनाथराव शिंदे यांची भेट घेतली यात गैर काहीही नाही, ते माझे जवळचे मित्र आहेत, २० मिनिटांच्या चर्चेत केवळ मतदार संघातील कामासंदर्भात बोललो, राजकीय चर्चा कोणतीही झालेली नसून आपण उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांना सुध्दा भेटलो असल्याचे ते म्हणाले. तर आपल्या पक्षप्रवेशाच्या केवळ पोकळ चर्चा असून जब तक जिंदा हू काँग्रेस का परिंदा हु असे म्हणत आपण काँग्रेस कदापी सोडणार नसल्याचे त्यांनी सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com