Nana Patole : "मी भाजपची खासदारकी सोडून आलो, ते लोक..." ; काँग्रेस प्रदेशाध्यक्षांनी सांगितली आतली गोष्ट

nana patole and narendra modi
nana patole and narendra modi

Nana Patole: मी भाजपची खासदारकी सोडून आलो आहे. ते लोक कसे आहेत याची मला पूर्ण जाणीव आहे. भाजप हा लोकशाही विरोधातील पक्ष असल्याचा हल्लाबोल काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी मंगळवारी (ता.१८) अकोला येथे केला.

राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते व माजी उममुख्यमंत्री अजित पवार यांच्या भाजप प्रवेशाच्या चर्चेबाबत त्यांनी थेट बोलण्याचे टाळून भाजपला दुसऱ्याची घरे फोडून आपले घर न सजविण्याचा सल्ला दिला आहे.

माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या भाजप प्रवेशाच्या चर्चेने सध्या महाराष्ट्राचे राजकारण ढवळून निघाले आहे. याबाबत अकोल्यातील एका कार्यक्रमाला उपस्थित राहण्यासाठी आलेले नाना पटोले यांना विचारले असता त्यांनी दुसऱ्यांच्या घरात काय चाललं आहे, हे डोकावून पाहण्याच काम काँग्रेस कधी करत नसल्याचे सांगितले. भाजपनेही दुसऱ्यांची घर फोडून स्वतःचे घर सजवू नये, असा सल्ला त्यांनी दिला.

भाजपबद्दल नागरिकांमध्ये पूर्वी सारखी सहानुभूती राहिलेली नाही. अकोल्यात देवेंद्र फडणवीस यांचे निकटवर्तीय मानले जाणारे उमेदवारास पदविधरांनी पराभूत केले. त्यामुळे भाजपबद्दल नागरिकांमध्ये रोष निर्माण होत असल्याचे दिसून येत असल्याचेही नाना म्हणाले.

आज शेतकरी हवालदिल झाला आहे. बेरोजगारमुळे लोक हैराण आहेत. या सगळ्यांचे प्रश्न सोडवून त्यांना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी काँग्रेस प्राधान्याने काम करीत असल्याचे त्यांनी सांगितले.

nana patole and narendra modi
Accident News: पैठणमध्ये 4 गाड्यांचा भीषण अपघात; घटनेत पिता-पुत्र जागीच ठार तर आई गंभीर जखमी

केंद्राकडून मदारीचा खेळ-

केंद्र सरकारने ईडी आणि सीबीआय हे दोन बंदर पकडून मदारीचा खेळ चालविला आहे. या यंत्रणांच्या माध्यमातून विरोधकांना दाबण्याचा प्रयत्न होतो आहे. सर्व परिस्थितीवर आम्ही लक्ष ठेवून आहोत.

अजित पवार यांच्यासोबत नागपूरच्या सभेत एकत्र होतो. त्यावेळी त्यांच्या बोलण्यातून कुठेही ते भाजपकडे चालले असल्याचे जाणवले नाही. ते या पक्षाला सोडून जाणार नाहीत, असा विश्वास काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले व्यक्त केला.

nana patole and narendra modi
Weather update : सलग तिसऱ्या दिवशी पाऱ्याने उसळी घेतली ; पारा ४१ अंशांवर

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com