Vidarbha Rain: विठ्ठल पावला... विदर्भात पावसाची संततधार; यवतमाळात नदी नाल्यांना पूर, नागपूर, भंडारा, गोंदिया, सर्वत्र पावसाचा संचा
Monsoon Update: आषाढी एकादशीनंतर विदर्भात जोरदार पावसाची सुरुवात झाली असून नागपूर, यवतमाळ, अकोला, गोंदिया, भंडारा, वर्धा जिल्ह्यांत संततधार सुरू आहे. काही भागांत पूरसदृश स्थिती तर कुठे दुर्घटनाही घडल्या आहेत.
नागपूर : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सपत्नीक पंढरपुरात विठ्ठल रुक्मिणीची महापूजा केली आणि ‘महाराष्ट्र व बळीराजाचे कल्याण कर’ असे मागणे विठुरायाकडे मागितले. त्यांच्या याच हाकेला विठ्ठलाने साथ दिली.