विद्यापीठाचा दीक्षान्त समारंभ डिसेंबरमध्ये

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 17 ऑगस्ट 2019

नागपूर  : राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाचा 107 वा दीक्षान्त समारंभ डिसेंबर महिन्यात होणार असल्याची माहिती आहे. समारंभासाठी अतिथी म्हणून नेमके कोण येणार यावर अद्याप अंतिम निर्णय झाला नाही. मात्र, पाहुण्यांच्या उपलब्धतेनुसारच डिसेंबर महिन्यात तारीख ठरणार असल्याचे कळते.

नागपूर  : राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाचा 107 वा दीक्षान्त समारंभ डिसेंबर महिन्यात होणार असल्याची माहिती आहे. समारंभासाठी अतिथी म्हणून नेमके कोण येणार यावर अद्याप अंतिम निर्णय झाला नाही. मात्र, पाहुण्यांच्या उपलब्धतेनुसारच डिसेंबर महिन्यात तारीख ठरणार असल्याचे कळते.
विद्यापीठाद्वारे दरवर्षी नोव्हेंबर महिन्यात दीक्षान्त समारंभ घेण्याचे ठरविण्यात आले होते. मात्र, गेल्या दोन वर्षांपासून त्यात विघ्न येत असल्याचे कळते. गेल्या तीन वर्षात विद्यापीठाने पदवी वाटपाचा बॅकलॉग भरून काढण्यासाठी जानेवारीतच 106 वा दीक्षान्त समारंभ घेतला. आता नव्या पदवी प्रदान करण्यासाठी डिसेंबरमध्ये दीक्षान्त समारंभ घेण्यात येणार आहे. विशेष म्हणजे अतिथीसाठी दरवर्षीच टाटा उद्योग समूहाचे रतन टाटा, अंबानी उद्योग समूहाचे मुकेश अंबानी यांच्या नावाची चर्चा असते. मात्र, यंदा त्या चर्चेला विराम देत, यापैकी कुणालाही बोलाविण्यावर निर्णय झाला नसल्याचे कुलगुरूंनी स्पष्ट केले. त्यामुळे नव्याच पाहुण्यांवर चर्चा होण्याची शक्‍यता आहे. दुसरीकडे राजकीय व्यक्ती कार्यक्रमात बोलवायचा का? याबाबत विद्यापीठाने भूमिका स्पष्ट केली नसल्याने सोहळ्यात राजकीय व्यक्ती सहभागी होण्याची चिन्हे आहेत.
....
पदके घटली
विद्यापीठाच्या स्थापनेनंतर बऱ्याच संस्था आणि दानदात्यांनी त्यांच्या आदर्शांच्या नावावर सुवर्ण, रौप्य आणि पारितोषिकासाठी पैसे दिले. कालांतराने विद्यापीठाकडून विद्यार्थ्यांना पदक देणेच कठीण झाले. त्यातूनच 2008 साली विद्यापीठाचे तत्कालीन कुलगुरू डॉ. श. नू. पठाण यांच्या कार्यकाळात पदकांसाठी असलेल्या रकमेचा आढावा घेण्यासाठी समिती स्थापन केली. समितीने बऱ्याच दानदात्यांना पत्र पाठवून सध्याची रक्कम पदकांसाठी पुरेशी नसल्याने ती वाढवून देण्याची विनंती केली होती. यापैकी अनेकांनी रक्कम वाढवून द्यायचे सोडून जमा रक्कम परत मागितली. काहींनी या पत्राची दखलच घेतली नाही. त्यामुळे अशा एकूण 275 दानदात्यांनी दिलेली पदके आणि पारितोषिक रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यामुळे दीक्षान्त समारंभात केवळ 182 पदके आणि पारितोषिकांचे वितरण होणार आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: The convocation of the university in December