नावापुढे लावले एमबीबीएस, एमडी तरीही मिळाली कोठडी, काय असावे कारण

संग्रहित छायाचित्र
संग्रहित छायाचित्र

अमरावती : डॉक्‍टर नसताना डॉक्‍टर म्हणून मिरविणाऱ्या व्यक्तिला पोलिसांनी ताब्यात घेतले असून आता या तोतया डॉक्‍टराची चौकशी करताना रुग्णांचे बयाण नोंदविले जाणार आहे. स्वत:च्या नावापुढे एमबीबीएस, एमडी (मेडिसीन), अशी पदवी लावून मोठे आठ खाटांचे रुग्णालय चालविणाऱ्या तोतया डॉक्‍टर अविनाश वसंत डबले (वय 38, रा. भवते ले-आउट) याला न्यायालयीन कोठडीत ठेवण्याचे आदेश देण्यात आले.


तोतया डबले याच्या पोलिस कोठडीची मुदत गुरुवारी (ता. नऊ) संपली. फ्रेजरपुरा पोलिसांनी त्याला पुन्हा न्यायालयासमोर हजर केले. न्यायालयीन कोठडी संपल्यामुळे डबलेची रवानगी मध्यवर्ती कारागृहात झाली. डॉक्‍टरविरुद्ध नितीन रमेश गोंडाणे यांच्या तक्रारीवरून फ्रेजरपुरा ठाण्यात 4 जुलै 2020 रोजी फसवणुकीचा गुन्हा दाखल झाला होता. तपास अधिकाऱ्यांनी रुग्णालयातील रेकॉर्ड, दस्तऐवज जप्त केले. रुग्णालयातील कर्मचारी, दोन्ही निवासी डॉक्‍टरांचे आतापर्यंत बयाण नोंदविण्यात आले. यापुढे डबलेच्या रुग्णालयात येणाऱ्या काही रुग्णांचे बयाण गुरुवारी (ता. नऊ) पोलिसांनी नोंदविले. जिल्हा शल्यचिकित्सकांकडे सुद्धा पोलिसांनी तक्रार केली होती. परंतु जिल्हा शल्यचिकित्सकांनी रुग्णालय सील करण्याबाबत असमर्थता दर्शवली.

डबले याने अमरावती, नागपूरसह यवतमाळ येथील मोठ्या खासगी रुग्णांलयामध्ये आरएमओ म्हणूनसुद्धा सेवा दिली, तर काही ठिकाणी मदतनीस म्हणून काम केले होते. रुग्णालय थाटण्यासाठी महापालिकेकडे अर्ज सादर केला होता. त्यामुळे पोलिसांनी महापालिकेकडून माहिती मागितली होती. त्यात डबले याने त्याच्या रुग्णालयात काम करणाऱ्या बीएचएमएस शिक्षित दाम्पत्याचे प्रमापणपत्र जोडल्याचे तपासात उघड झाले होते.

संपादन : नरेश शेळके

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com