esakal | आता कुठे व्यवसायाला झाली होती सुरुवात, पण कोरोना परत आला अन् सर्वच थांबलं
sakal

बोलून बातमी शोधा

corona effect on business in yavatmal

फेब्रुवारी महिन्यात कोरोना रुग्णांची संख्या वाढत असल्याने खबरदारी म्हणून जिल्हा प्रशासनाने संचारबंदीचा निर्णय घेतला. शनिवार ते सोमवार मिनी लॉकडाउन करण्यात आले. तरीदेखील बाधितांची संख्या वाढतच आहे.

आता कुठे व्यवसायाला झाली होती सुरुवात, पण कोरोना परत आला अन् सर्वच थांबलं

sakal_logo
By
राजकुमार भितकर

यवतमाळ : कोरोनाचा संसर्ग झपाट्याने वाढत आहे. फेब्रुवारीपेक्षा मार्च महिन्यात बाधितांच्या संख्येत लक्षणीय वाढ होणार असून, लॉकडाउन घोषित होण्याची भीती सर्वसामान्य जनतेत आहे. असे झाल्यास कसाबसा सुरू झालेला रोजगार हिरावला जाण्याची टांगती तलवार आहे. 

हेही वाचा - ‘नको ते गॅस सिलिंडर, आपली चुलच बरी’; सिलिंडरच्या किमती भडकताच ‘उज्ज्वला’ पुन्हा चुलीवर

फेब्रुवारी महिन्यात कोरोना रुग्णांची संख्या वाढत असल्याने खबरदारी म्हणून जिल्हा प्रशासनाने संचारबंदीचा निर्णय घेतला. शनिवार ते सोमवार मिनी लॉकडाउन करण्यात आले. तरीदेखील बाधितांची संख्या वाढतच आहे. जिल्ह्यात मंगळवारी (ता.दोन) वर्षभरातील सर्वाधिक ५११ बाधितांचे अहवाल पॉझिटिव्ह आले. यवतमाळ जिल्ह्यातील पाच तालुके कोरोनाचे हॉटस्पॉट बनले आहेत. संसर्ग रोखण्यासाठी जिल्हा प्रशासन कधीही लॉकडाउन घोषित करू शकते. मात्र, व्यावसायिक आणि मजुरांची गाडी रुळावर येत असतानाच पुन्हा कोरोनाचा उद्रेक झाला. पुन्हा लॉकडाउन लागल्यास उपासमारीची वेळ आल्याशिवाय राहणार नाही, अशी भीती व्यक्त केली जात आहे. शासनाने संसर्ग रोखण्यासाठी कडक निर्बंध करावे. मात्र, लॉकडाउन करून रोजगार हिरावू नये, अशी मागणी राजकीय पक्षांसह नागरिक करीत आहेत. 

हेही वाचा - स्टार्टअप : ‘ओटोटायमा’ वाचविणार वीज; मोबाईलवर ठरणार विजेचा टायमिंग

कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी कडक निर्बंधाला कुणाचाही विरोध नाही. मात्र, लॉकडाउनसारखा घातक निर्णय सरकारने घेऊ नये, अशी सुरुवातीपासूनची आमची मागणी आहे. कोरोना संसर्गाला आळा घालण्यास सरकार अपयशी ठरल्याने सर्वसामान्य जनतेला वेठीस धरण्याचा प्रयत्न करण्यात येत आहे. पुन्हा लॉकडाउन लागल्यास बेरोजगारांच्या आत्महत्या वाढण्याची शक्‍यता नाकारता येत नाही. 
- अनिल हमदापुरे, जिल्हाध्यक्ष, मनविसे, यवतमाळ. 

मागील वर्षीच्या लॉकडाउनमधून आम्ही कसेबसे वाचलो. हा काळ कसा गेला, हे आम्हालाच माहीत. प्रशासनाकडून थोडी शिथिलता मिळाल्याने व्यवसाय सुरू झाला होता. आता कोरोनामुळे बाजारपेठेच्या वेळेत बदल करण्यात आला. त्याचा परिणाम व्यवसायावर झाला आहे. सरकारने लॉकडाउन करू नये, अशी मागणी आहे. 
- बाबाराव लोखंडकर, व्यावसायिक, यवतमाळ. 


 

loading image