CoronaVirus: धक्कादायक ! कोरोना संशयीत रुग्णाचा पहिला मृत्यू

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 14 मार्च 2020

सर्दी व तापाची लक्षणे असलेला कथितस्तरावरील कोरोनाचा संशयीत रुग्णाला बुलडाणा सामान्य रुग्णालयातील विलगीकरण कक्षात शनिवारी दाखल करण्यात आले होते. शुक्रवारी हा संशयीत रुग्ण सौदी अरेबियातून आला होता.  दरम्यान, ताप आणि सर्दीची लक्षणे त्याच्यामध्ये आढळल्यामुळे त्यास बुलडाणा येथील विलगीकरण कक्षात खबरदारीच्या दृष्टीकोणातून ठेवण्यात आले होते. मात्र, रुग्णाची प्रकृती खालावल्याने शनिवार (ता.14) बुलडाणा जिल्ह्यातील कोरोना संशयीत रुग्णाचा मृत्यू झाला.

बुलडाणा: सर्दी व तापाची लक्षणे असलेला कथितस्तरावरील कोरोनाचा संशयीत रुग्णाला बुलडाणा सामान्य रुग्णालयातील विलगीकरण कक्षात शनिवारी दाखल करण्यात आले होते. शुक्रवारी हा संशयीत रुग्ण सौदी अरेबियातून आला होता.  दरम्यान, ताप आणि सर्दीची लक्षणे त्याच्यामध्ये आढळल्यामुळे त्यास बुलडाणा येथील विलगीकरण कक्षात खबरदारीच्या दृष्टीकोणातून ठेवण्यात आले होते. मात्र, रुग्णाची प्रकृती खालावल्याने शनिवार (ता.14) बुलडाणा जिल्ह्यातील कोरोना संशयीत रुग्णाचा मृत्यू झाला.

शहरात कोरोना संशयित रुग्णाला शनिवारी दुपारी जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. दुपारी 4.20 वाजता उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला आहे. सौदी अरेबिया येथून नुकताच दाखल झालेला हा रुग्ण सकाळी बुलडाणा येथील एका खासगी रुग्णालयात गेला होता. तेथून त्याला सिव्हील हॉस्पिटलमध्ये पाठविण्यात आले होते. संबंधित रुग्णाचे सॅम्पल प्रयोगशाळेत पाठविण्यात आले आहेत. अर्थात कोरोना पॉझिटिव्ह आहे की नाही याबाबत दोन दिवसानंतर रिपोर्ट कळणार होता. मात्र, नागपूर येथून रिपोर्ट येण्यापूर्वीच संशयीत रुग्णाचा मृत्यू झाला असल्याने त्याच्या परिवाराला वैद्यकीय देखरेखीत ठेवण्याची मागणी होत आहे. नागरिकांनी संयम आणि शांतता बाळगावी, असे आवाहन आरोग्य प्रशासनाकडून करण्यात येत आहे.

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Corona suspects first death in buldana district