esakal | अकोल्यात कोरोनाचा पहिला बळी 
sakal

बोलून बातमी शोधा

Corona's first death at Akola

अकोला शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात मधुमेह,उच्च रक्तदाब, खोकला या आजाराने ग्रस्त ४५ वर्षे वयाचा रुग्ण सोमवारी (ता.१३) सायंकाळी साडेपाच वाजता दाखल झाला होता. खबरदारी म्हणून त्या रुग्णाचे घशातील स्त्रावाचे नमुने कोरोना तपासणी साठी घेण्यात आले होते. त्याचदिवशी रात्री साडेआठ वाजता उपचारा दरम्यान त्याचा मृत्यू झाला. दरम्यान बुधवारी (ता.१५)  सकाळी प्राप्त झालेल्या तपासणी अहवालात त्याचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे.

अकोल्यात कोरोनाचा पहिला बळी 

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

अकोला: अकोला शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात मधुमेह,उच्च रक्तदाब, खोकला या आजाराने ग्रस्त ४५ वर्षे वयाचा रुग्ण सोमवारी (ता.१३) सायंकाळी साडेपाच वाजता दाखल झाला होता. खबरदारी म्हणून त्या रुग्णाचे घशातील स्त्रावाचे नमुने कोरोना तपासणी साठी घेण्यात आले होते. त्याचदिवशी रात्री साडेआठ वाजता उपचारा दरम्यान त्याचा मृत्यू झाला. दरम्यान बुधवारी (ता.१५)  सकाळी प्राप्त झालेल्या तपासणी अहवालात त्याचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे.

 या व्यक्तीच्या संपर्कातील व्यक्तींची तपासणी करून त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात येत आहे.अशी माहिती शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाकडून प्राप्त झाली आहे.

कोरोना पॉझिटिव्ह आढळले 14 मात्र आकडा बारावर कायम
अकोला जिल्ह्यात आतापर्यंत 14 कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळले आहेत यापैकी एका जणाने आत्महत्या केलेली असून तर दुसऱ्या रुग्णाचा मृत्यू झाल्याचे प्रशासनाने बुधवारी जाहीर केले. या 14 पॉझिटिव्ह रुग्णांपैकी दोघांचा मृत्यू झाला असल्याने अकोल्यात सध्याच्या घडीला बारा हा आकडा कायम आहे.

loading image