esakal | अबब...! चक्क आठशे पोलिस कर्मचारी मास्क विना

बोलून बातमी शोधा

coronavirus: akola 800 police dont have mask

सध्या सर्वत्र कोरोना विषाणूची दहशत असताना स्टेशन डायरीवर तक्रार नोंदविण्यासाठी आलेल्या नागरिकांपासून अंतर ठेऊनच कामकाज करावे अशा सुचना देण्यात आल्या आहेत. तर पुढील काही दिवसांत शहरासह जिल्ह्यातील पोलिस ठाण्यांमध्ये कोरोना विषाणूपासून कसा बचाव करता येतो हे सांगणारे सुचना फलक लावण्यात येणार असल्याची माहिती शहर उपविभागीय पोलिस अधिकारी सचिन कदम यांनी दिली.

अबब...! चक्क आठशे पोलिस कर्मचारी मास्क विना
sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

अकोला : अत्यंत वर्दीचे शहर म्हणून ओळख असलेल्या अकोला शहरात आठ पोलिस ठाण्यांच्या माध्यमातून कायदा आणि सुव्यवस्था अबाधीत ठेवली जाते. यासाठी ‘ऑन द फिल्ड’ एकूण 800 पोलिस कर्मचारी रस्त्यावर असतात. मात्र, अद्यापही या पोलिस कर्मचाऱ्यांना पोलिस विभागाकडून मास्क, सॅनिटायझर आणि हॅंडवॉश वाटप करण्यात आलेले नसल्याची माहिती आहे. तर जिल्हाधिकाऱ्यांनी दिलेल्या सूचनांचा पोलिसांसमोर वाचन करून दाखविण्यात आले आहे.

सध्या सर्वत्र कोरोना विषाणूची दहशत असताना स्टेशन डायरीवर तक्रार नोंदविण्यासाठी आलेल्या नागरिकांपासून अंतर ठेऊनच कामकाज करावे अशा सुचना देण्यात आल्या आहेत. तर पुढील काही दिवसांत शहरासह जिल्ह्यातील पोलिस ठाण्यांमध्ये कोरोना विषाणूपासून कसा बचाव करता येतो हे सांगणारे सुचना फलक लावण्यात येणार असल्याची माहिती शहर उपविभागीय पोलिस अधिकारी सचिन कदम यांनी दिली.

सार्वजनिक ठिकाणी थुंकाल तर खबरदार
कोरोना विषाणूचा फैलाव मोठ्या प्रमाणावर होऊ नये यासाठी खर्रा खाऊन थुंकणाऱ्यांकडे आता प्रशासनाचे लक्ष लागले आहे. जो कोणी खर्रा खाऊन सार्वजनिक ठिकाणी थुंकेल त्याला दोनशे रुपये दंड करण्यात येतो. आता या विषाणूचा मोठ्या प्रमाणावर फैलाव होऊ नये म्हणून खर्रा खाऊन सार्वजनिक ठिकाणी थुंकणाऱ्यांवर दंडाची रक्कम वाढविण्याची तरतुद केली जात आहे.

उघड्यावरील खाद्य पदार्थांची होणार तपासणी
कोरोना विषाणू हा हवेतून संक्रमीत होऊन पसरतो तेव्हा तो उघड्यावरील खाद्यपदार्थांवरही राहू शकतो. तेव्हा नागरिकांनी जेणे करून काही दिवस उघड्यावरील खाद्य पदार्थ खाणे टाळावेच सोबतच उघड्यावर खाद्यपदार्थ विक्री करणाऱ्यांनी अन्न व औषध प्रशासनाने दिलेल्या नियमांचे पालन करूनच त्या पदार्थांची विक्री करावी असे आदेश अन्न व औषध विभागाने दिले आहेत. नियमांचे जो पालन करणार नाही त्यांच्यावर कायदेशीर कडक कारवाई केली जाईल असा इशारा अन्न सुरक्षा अधिकारी रावसाहेब वाकडे यांनी दिला आहे. सोबतच मास्क आणि सॅनिटायझरचा काळाबाजार करणाऱ्या साठेबाजांवर कारवाई सुरू असून, दोषी आढळल्यास कारवाई केली जाणार आहे.