coronaVirus:वसतीगृहेही बंद; सहा हजारावर विद्यार्थी घरी

coronaVirus: akola Hotels closed; Six thousand students home
coronaVirus: akola Hotels closed; Six thousand students home

अकोला: कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी खबरदारीचा उपाय म्हणून आदिवासी, समाज कल्याण विभागाअंतर्गत असलेली वसतीगृहे, निवासी आश्रमशाळा व निवासी अपंग शाळा बंद करण्याचा निर्णय विभागांच्या अधिकाऱ्यांनी घेतला आहे. जिल्ह्यातील एकूण 75 वसतीगृहांमध्ये सध्या 6 हजारावर विद्यार्थी आहेत.

कोरोना विषाणूच्या प्रादुर्भाव रोखण्यासाठी खबरदारीचा उपाय म्हणून सर्व महापालिका, नगरपालिका, नगरपंचायती या शहरी व ग्रामीण क्षेत्रातील सर्व शाळा, महाविद्यालये आणि अंगणवाड्या 31 मार्चपर्यंत बंद करण्याचा निर्णय याआधीच घेण्यात आला आहे. त्यानंतर आता विविध अनुदानित व शासकीय वसतीगृहे, आश्रमशाळा बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. सामाजिक न्याय विभागाअंर्तगत येत असलेल्या शासकीय निवासी शाळा, अनुदानित वसतीगृहातील विद्यार्थ्यांना (10 वी 12वीच्या परीक्षा देणारे विद्यार्थी वगळून) 31 मार्च 2020 पर्यंत त्यांच्या घरी पाठविण्याचा आदेश जारी करण्यात आला आहे. विद्यार्थी आजारी असल्यास वैद्यकीय तपासणी करुनच नोंद घेण्यात यावी, असेही आदेशात नमूद करण्यात आले आहे. आश्रम शाळा, वसतीगृहातील कार्यालयीन कर्मचारी वगळता इतर कर्मचाऱ्यांनी शाळेत उपस्थित राहण्याची आवश्यकता नाही. दक्षता व खबरदारी घेण्याच्या दृष्टीकाेनातून नियाेजन करण्यात यावे, असेही समाज कल्याण अधिकाऱ्यांनी त्यांच्या पत्रात नमूद केले आहे.

वसतीगृहे, आश्रमशाळा व विद्यार्थी संख्येवर दृष्टीक्षेप

  •  राज्य शासनाच्या समाज कल्याण विभागाची जिल्ह्यात 8 वसतीगृहे आहेत. त्यात 680 विद्यार्थी व विद्यार्थिनी राहतात. अकोला शहरात मुला-मुलींचे प्रत्येकी दोन-दोन असे चार वस्तीगृह आहेत. त्यामध्ये विद्यार्थी-विद्यार्थिनींची संख्या 350 आहे. अकोट येथे 2 वसतीगृहांमध्ये 155 विद्यार्थी-विद्यार्थिनी आहेत. मूर्तिजापूर व बार्शिटाकाळी येथे प्रत्येकी एक वस्तीगृह आहे. याठिकाणी अनुक्रमे 75 आणि 100 विद्यार्थी-विद्यार्थिनी राहतात.
  •  प्रकल्प संचालक आदिवासी विकास विभागाअंतर्गत एकूण 6 वसतीगृहे असून, मुलींसाठी दोन आणि मुलांसाठी 4 वसतीगृहे आहेत. यात 400 विद्यार्थी आणि 200 विद्यार्थिनी राहतात.
  • प्रकल्प संचालक आदिवासी विकास विभागाअंतर्गत आश्रम शाळांची संख्या 2 आहे. त्यात 1 हजार 100 वद्यार्थी-विद्यार्थिनी राहतात. अनुदानित आश्रम शाळांची संख्या 5 असून, यात 1 हजार 600 विद्यार्थी-विद्यार्थिनी राहतात.
  • जिल्हा परिषदेच्या समाज कल्याण विभागामार्फत एकूण 52 अनुदानित वसतीगृह संचालित करण्यात येतात. त्यामध्ये 2 हजार 418 विद्यार्थी आहेत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com