esakal | कापूस खरेदीचा नोव्हेंबरचा मुहूर्त हुकणार? पहिल्या कापसात ओलावा जास्त
sakal

बोलून बातमी शोधा

Cottan

कापूस खरेदीचा नोव्हेंबरचा मुहूर्त हुकणार? कापसात ओलावा जास्त

sakal_logo
By
चेतन देशमुख

यवतमाळ : खरीप हंगाम २०२१-२२ मधील कापूस खरेदीचे नियोजन करून नोव्हेंबरच्या पहिल्या आठवड्यात कापूस खरेदीचा शुभारंभ करण्याचे आदेश सहकार व पणन मंत्री यांनी दिले आहे. प्रत्यक्षात पणन महासंघाने मनुष्यबळाअभावी खरेदी करणे शक्य नसल्याचे भूमिका घेतली आहे. तसेच कापसात १२ टक्क्यांपेक्षा जास्त ओलावा असल्याने हा कापूस खरेदी करता येत नाही. त्यामुळे कापूस खरेदीचा नोव्हेंबरचा मुहूर्त हुकण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.

खरीप हंगामातील कापूस खरेदीसाठी शासनानकडून तयारीचा आढावा घेण्यात आला. गेल्या वर्षी राज्यात ४२ लाख हेक्टरवर कापसाचा पेरा झाला होता. यावर्षी कापसाचा पेरा ६.४४ टक्यांनी घटला आहे. जास्त पावसामुळे काही भागात कापसाचे बोंड काळे पडले असले तरी पिकाची परिस्थिती समाधानकारक आहे. कापसाला खासगी बाजारात दर चांगले आहे. त्यामुळे नियोजन करून खरेदी केंद्र नोव्हेंबरमध्ये उघडण्याची सूचना सहकार व पणन मंत्र्यांनी दिली आहे. कापूस पणन महासंघाच्या पदाधिकाऱ्‍यांनी मात्र, नोव्हेंबरच्या पहिल्या आठवड्यात खरेदी शक्य नसल्याचे बोलत आहे.

हेही वाचा: मैत्रीपूर्ण संबंधात पती ठरायचा अडसर; मित्राच्या मदतीने केला ‘गेम’

पणन महासंघाकडे मनुष्यबळ नाही. त्यांचे नियोजन करण्यासाठी उशीर लागणार आहे. खासगी बाजारात कापसाचे दर चांगले असल्याने महासंघाकडे सुरुवातीला मोजकाच कापूस येण्याची शक्यता आहे. विशेष म्हणजे, सुरुवातीच्या कापसात ओलावा १२ टक्क्यांपेक्षा अधिक असतो. केंद्रशासनाच्या नियमाप्रमाणे १२ टक्क्यांपेक्षा जास्त ओलावा असलेला कापूस न घेण्याच्या सूचना आहे.

शेतकऱ्‍यांचा कापूस परत केला तर ‘वादविवादाचे’ प्रसंग निर्माण होण्याची शक्यता आहे. त्यामुळे शेतकऱ्‍यांचे हित लक्षात घेता नोव्हेंबरच्या शेवटच्या आठवड्यात पणन कापूस खरेदी केंद्र सुरू करू शकतात. नोव्हेंबरमध्ये कापूस खरेदी सुरू करायची असल्यास शासनाने मनुष्यबळ पुरवावे, असा एक सूर पणन महासंघाच्या संचालकांत आहे. सहकार मंत्री तसेच पणन महासंघ यांच्यात केंद्र सुरू करण्यावर मतभेद असल्याने केंद्र कधी सुरू होणार याकडे शेतकऱ्‍यांचे लक्ष लागले आहे.

हेही वाचा: रात्रीच्या अंधारात बोकड चोरला, कापला अन् मालकालाच विकला

शेतकऱ्‍यांच्या हितासाठी पणन महासंघ खरेदी केंद्र सुरू करते. यावेळी मनुष्यबळाचा अभाव आहे. शासनाने मनुष्यबळ द्यावे, यासाठी आमचा पाठपुरावा सुरू आहे. यावर अजून निर्णय झालेला नाही. कापूस खरेदी संदर्भात लवकरच संचालक मंडळांची बैठक होणार आहे. यात खरेदीचा वेळ तसेच केंद्राबाबत निर्णय होईल.
- अंनतराव देशमुख, अध्यक्ष, कापूस पणन महासंघ
loading image
go to top