अर्थकारण समजल्याने विदर्भात कापसाचे भाव वधारले

शेतमालाच्या बाजारात यापूर्वी हमीदरानंतर खरेदीदार शेतमालाचे भाव ठरवत होता.
Cotton production
Cotton production sakal

अमरावती : कापसातील (Cotton) अर्थकारण समजल्याने भाव ठरविण्याचे अधिकार यावर्षी प्रथमच शेतकऱ्यांनी आपल्या हाती घेतले. त्याचा एकूणच परिणाम खुल्या बाजारातील आवकवर होत असून, कापसाचे भाव चांगलेच वधारले (Cotton Rate Grow) आहे. तर सोयाबीनचे भावही सहा हजारांवर खेळू लागले आहेत. या वाढीव दराचा शेतकऱ्यांना बऱ्यापैकी लाभ होत आहे. विशेषतः कापूस व सोयाबीनच्या (Soybean) शेतकऱ्यांनी आपली साठा करण्याची क्षमता वाढविली आहे.

शेतमालाच्या बाजारात यापूर्वी हमीदरानंतर खरेदीदार शेतमालाचे भाव ठरवत होता. मात्र यंदा प्रथमच शेतकऱ्यांनी बाजाराला इंगा दाखवत गरजेपुरतीच आवक बाजारात आणल्याने खरेदीदारांची गोची झाली आहे. खरेदीदारांकडे साठा करण्याची क्षमता असल्याने तो त्याला परवडेल असे भाव जाहीर करीत होता.

Cotton production
अमेरिकेत एका दिवसात १० लाख रुग्ण; आधीच्या तुलनेत तीनपट जास्त

मात्र यावर्षी शेतकऱ्यांनी आवक रोखल्याने बाजारातील आवक मंदावली व खरेदीदाराला भाव चढे ठेवणे भाग पडले. अमरावती जिल्ह्यातील सर्व जिनिंग प्रेसिंगमधील कापसाची आवक अल्प आहे. शेतकरी सहकारी जिनिंग प्रेसिंगमध्ये दररोज सरासरी ७०० ते ८०० क्विंटल कापसाची आवक होत असून, गतवर्षी हे प्रमाण तिप्पट चौपट होते, अशी माहिती सूत्रांनी दिली.

कापसाला उतारा बघून भाव दिल्या जातो. एक क्विंटलमध्ये ३५ ते ३६ किलो रुईचा उतारा येतो. तर ६२ ते ६३ किलो सरकी निघते. रुई व सरकीचे प्रमाण प्रति क्विंटलमध्ये ३५ ते ६५ असे असायला पाहिजे. खरेदीदार हे प्रमाण बघून भाव निश्चित करीत असे. उतारा काढताना पाच क्विंटलमध्ये एक गाठ असा काढण्यात येतो व त्यास खर्च येतो ८०० रुपये. या खर्चात त्याला क्विंटलमागे ६२ किलो सरकी व ३५ किलो रुई मिळते.

रुईला २०० रुपये किलो तर, सरकीला ४० रुपये किलो भाव घाऊक बाजारात आहे. या सर्वाचा पूर्ण लाभ जिनिंग प्रेसिंग चालविणाऱ्या खरेदीदारांना होत होता. लाभाचे हे अर्थकारण शेतकऱ्यांना समजल्याने त्यांनी खरेदीदाराला अडवून भाव वाढविण्यास भाग पाडले आहे. त्यामुळे सध्या कापसाला चढे दर मिळू लागले आहेत. साहजिकच हा लाभ शेतकऱ्यांच्या पदरी पडू लागल्याने त्यांनी चांगल्या भावाची अपेक्षा ठेवली आहे.

Cotton production
वीज वापराच्या नावाखाली 12 हजार कोटींचा भ्रष्टाचार : प्रताप होगाडे

यावर्षी खरीप हंगामात सोयाबीनला अतिवृष्टी व संततधार पावसाचा, तर नंतर लांबलेल्या पावसाचा कापसाला फटका बसला. दोन्ही पिकांची उत्पादनाची सरासरी ३० ते ४० टक्क्यांनी घसरली, असा कृषी खात्याचा अहवाल आहे. खासगी बाजारात कापसाला सद्यःस्थितीत ९ हजार ५०० ते ९७०० रुपयांपर्यंत भाव आहे. हमीदराच्या तुलनेत हा भाव दीडपट आहे.

भाव वाढविण्यास पाडले भाग

कापसातील अर्थकारण शेतकऱ्यांच्या ध्यानी आल्याने त्यांनी बाजारातील भाव बघून आवक आणली आहे. उत्पादन खर्चावर नफा मिळत असेल तरच आवक न्यायची अन्यथा घरातच साठा करून ठेवायचा, ही नीती शेतकऱ्यांनी यंदा अंमलात आणल्याचे शेतकरी सहकारी जिनिंग प्रेसिंगचे संचालक प्रवीण भुजाडे यांनी सांगितले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com