esakal | बालकांचे लैंगिक शोषण करणाऱ्यांना न्यायालयीन कोठडी
sakal

बोलून बातमी शोधा

file photo

बालकांचे लैंगिक शोषण करणाऱ्यांना न्यायालयीन कोठडी

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

अमरावती : वडाळी परिसरातील एकाच नव्हे तर, तब्बल तीन अल्पवयीन मुले अनैसर्गिक अत्याचाराचे बळी ठरल्याची धक्कादायक माहिती पोलिसांच्या प्राथमिक तपासातून पुढे आली. फ्रेजरपुरा पोलिसांनी तीन युवकांना अटक करून शुक्रवारी न्यायालयापुढे हजर केले असता त्यांना न्यायालयीन कोठडी मिळाली आहे. गैरकृत्यात सहभागी दोन अल्पवयीन मुलांचीही चौकशी झाली.
रवी कांबळे (वय 24), वैभव मेश्राम (वय 23 दोघेही रा. देवीनगर, वडाळी) व आकाश ठाकरे (वय 24 रा. भोईपुरा, वडाळी) अशी अटक झालेल्या युवकांची नावे आहेत. फ्रेजरपुरा पोलिसांनी अटकेनंतर तिघांनाही शुक्रवारी (ता. 23) न्यायालयासमोर हजर केले. न्यायालयाने त्यांना न्यायालयीन कोठडी सुनावली. नमूद तिघांसह दोन अल्पवयीन अशा पाच जणांनी परिसरातील तीन अल्पवयीन मुलांवर अनैसर्गिक अत्याचार केल्याचे तपास अधिकाऱ्यांनी सांगितले. त्या तिघांचे प्रकरण चाइल्ड लाइनच्या माध्यमातून फ्रेजरपुरा पोलिसांपर्यंत पोहोचले. गुन्हा दाखल झाल्यानंतर गुरुवारपर्यंत अन्य दोन अल्पवयीन मुलांवर असे लैंगिक अत्याचार झाल्याची बाब पुढे आली असली तरी, गुरुवारी सायंकाळपर्यंत त्या दुसऱ्या दोन मुलांच्या पालकांनी पोलिसांशी संपर्क साधला नव्हता. एप्रिल 2019 मध्ये शाळेला सुटी लागल्यानंतर खेळण्याच्या बहाण्याने पाचही जणांनी पीडित तीन अल्पवयीन मुलांना जंगलात टेकडीजवळ नेउन त्यांच्यावर अनैसर्गिक अत्याचार केला होता.

loading image
go to top