
जलालखेडा : काटोल ते वरूड रस्त्यावर पडलेल्या भेगामुळे आणखी एक तरुणाला जीव गमवावा लागला. रविवारी (ता.१) दुपारी साडेतीनच्या सुमारास नायगाव वरून जलालखेडा येथे मोटारसायकलने येत असताना पुनर्वसन येथील पेट्रोलपंपा जवळ रस्त्यावर पडलेल्या भेगामुळे मोटारसायकलवरील संतुलन बिघडले व मोटारसायकल सरळ रस्त्यावरील दुभाजकावर जाऊन आदळली. त्यात हरिदास नारायण निंबुरकर (वय४०, रा.नायगाव) याला जीव गमवावा लागला.