अद्ययावत माहितीसाठी ऑनलाइन प्रोफाइल तयार करा

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 3 सप्टेंबर 2019

नागपूर : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाद्वारे राज्यातील माध्यमिक शाळा व कनिष्ठ महाविद्यालयांचे नवे प्रोफाईल तयार करावे लागणार आहे. यासंदर्भातील माहिती शाळांना ऑनलाइन भरायची आहे. नागपूर विभागीय मंडळाचे सचिव रविकांत देशपांडे यांनी शाळांना पत्र पाठवून तसे आदेश दिले आहेत.

राज्यातील मंडळाशी संलग्न असलेल्या शाळा आणि कनिष्ठ महाविद्यालयांची अद्ययावत माहिती देताना बऱ्याच अडचणी येतात. अनेकदा जुनीच माहिती अपडेट केली जाते. त्यामुळे राज्य मंडळाद्वारे आता दहावी-बारावी शाळांचे नवे प्रोफाईल तयार केले जाणार आहे. शाळांनी सद्यस्थितीतील माहिती ऑनलाइन भरावयाच्या सूचना दिल्या आहेत. सप्टेंबर महिन्यात हे कामकाज केले जाणार आहे. त्यासाठी समितीही स्थापन केली आहे. त्यातूनच राज्य मंडळाने शाळा व कनिष्ठ महाविद्यालयांची भौगोलिक माहिती गुगल मॅपवरून द्यावी, अशी सूचना केली आहे. यूडायस आयडी, ओटीपी, पासवर्ड यासारख्या आधुनिक प्रणाली वापरल्यामुळे ही माहिती कायमस्वरूपी राहणार आहे.

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Create an online profile