मधूर वाईन शॉपच्या मालकावर गुन्हा

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 24 सप्टेंबर 2019

नागपूर ः सीताबर्डीतील असलेल्या एका वाईन शॉपमधील नोकराने चार दिवस सुटी घेतल्यामुळे नाराज झालेल्या मालकाने आणि शॉपच्या दोन्ही मॅनेजरने नोकराचा मानसिक व शारीरिक छळ केला. तसेच मालकाने 50 लाख रुपये खंडणी मागितल्याचा वाडी पोलिस ठाण्यात खोटा गुन्हा दाखल केल्याने नैराश्‍यात गेलेल्या नोकराने आत्महत्या केली. या प्रकरणी कळमना पोलिसांनी मालक आणि व्यवस्थापकावर आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल केला. या प्रकरणी दोघांना पोलिसांनी अटक केली.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अतुल प्रभाकर ठवरे (वय 29, नेताजीनगर, कळमना) हा आरोपी विशाल जयस्वाल याच्या धंतोलीतील मधूर वाईन शॉपमध्ये वर्कर म्हणून कामाला होता. या शॉपमध्ये आरोपी शेखर सोनकुसरे आणि शेखर बोरकर हे दोघे मॅनेजर म्हणून नोकरीवर आहेत. मे 2018 महिन्यात अतुलच्या भावाचे लग्न असल्यामुळे त्याला सुटी हवी होती. मात्र, मालक विशाल जयस्वाल याने सुटी नाकारली तर शेखर सोनकुसरेने सुटीवर गेल्यास वेतन देणार नसल्याची धमकी दिली होती. मात्र, भावाचे लग्न असल्यामुळे त्याने चार दिवसांची सुटी घेतली होती. त्यानंतर तो मधूर वाईन शॉपमध्ये गेला. मॅनेजर शेखरने त्याला अश्‍लील शिवीगाळ करून कामावरून काढून टाकल्याचे सांगितले. अतुलने हात-पाय जोडत नोकरीवर ठेवण्याची विनंती केली. मात्र, शेखरने त्याचा उर्वरित पगार न देता शॉपबाहेर हाकलून दिले. त्याने मालक विशाल जयस्वालची भेट घेतली असता त्यांनीही हाकलून दिले. तेव्हापासून तो तणावात राहत होता. 31 मे रोजी अचानक वाडी पोलिस ठाण्यात अतुल ठवरेवर मॅनेजर शेखर सोनकुसरेला पाच लाखांची खंडणी मागितल्याचा गुन्हा दाखल झाला. त्याला लगेच वाडी पोलिसांनी अटक केली. काही दिवसांनी जामिनावर बाहेर आल्यानंतर अतुल पूर्णतः नैराश्‍यात गेला. त्यामुळे त्याने 20 ऑगस्टला घरात गळफास घेऊन आत्महत्या केली. या प्रकरणी कळमना पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद केली होती.

वाडीत खोटा गुन्हा दाखल
मधूर शॉपचा मालक विशाल जयस्वाल आणि मॅनेजर शेखर सोनकुसरेने वाडी पोलिसांशी संगनमत करून 50 लाख रुपयांची खंडणी मागितल्याची खोटी तक्रार वाडी पोलिसात दाखल केली. पोलिसांनीही ताबडतोब अतुलला अटक करून जबर मारहाण केली. याच कारणामुळे अतुलने आत्महत्या केली, हा सर्व घटनाक्रम अतुलने सुसाईड नोटमध्ये लिहून ठेवला आहे.

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Crime on the owner of a delicious wine shop