Crime: पोलिसांनी जप्त केला ९ लाखांचा देशीविदेशी दारूचा साठा, कोलपल्ली गावात कारवाई

Latest Maharashtra News: कोलपल्ली गावात कारवाई; तीन आरोपींविरुद्ध दाखल करण्यात आला गुन्हा
Crime: पोलिसांनी जप्त केला ९ लाखांचा देशीविदेशी दारूचा साठा, कोलपल्ली गावात कारवाई
Updated on: 

Latest Gad पोळा आणि येणाऱ्या गणेशोत्सवासह इतर महत्त्वाच्या सणांच्या काळात अवैध दारूला आळा घालण्यासाठी पोलिसांनी धडक कारवाई सुरू केली आहे. अहेरी ठाण्यात नव्याने रुजू झालेले पोलिस निरीक्षक स्वप्निल ईज्जपवार यांच्या नेतृत्वात कोलपल्ली येथे करण्यात आलेल्या कारवाईत तीन जणांच्या घरांमधून तब्बल ९ लाख ३५ हजारांचा देशी-विदेशी दारूचा साठा जप्त करण्यात आला.

सण-उत्सव शांततेचे पार पाडून उत्सवादरम्यान कोणताही अनुचित प्रकार घडू नये, अवैधरित्या चालणाऱ्या धंद्यांवर अंकुश ठेवावा, असे आदेश पोलिस अधीक्षक नीलोत्पल यांनी दिले आहेत.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com