जमिनीच्या वादातून आजी-माजी नगरसेवकावर गुन्हे

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 4 ऑक्टोबर 2019

भद्रावती (जि. चंद्रपूर) : नगरपालिकेच्या मालकीच्या गवराळा गणेश मंदिर परिसरातील भक्‍तनिवासाला जबरदस्तीने कुलूप ठोकणारे माजी नगरसेवक प्रशांत कारेकर, संजय कारेकर व नगरसेवक नंदू पढाल यांच्या विरोधात पालिकेच्या तक्रारीवरून पोलिसांनी गुन्हे दाखल केले आहेत. याची सखोल चौकशी करून त्यांच्यावर कारवाई करण्यात येईल, असे पोलिसांनी सांगितले.

भद्रावती पालिकेच्या सांगण्यानुसार, गवराळा मंदिर परिसरातील कारेकर व अन्य कुटुंबीयांच्या मालकीची जागा परिसराच्या विकासासाठी जमीन मालकांनी 2011 मध्ये पालिकेला लिहून दिली होती. त्यानुसार भद्रावती पालिकेने या जागेवर भक्‍तनिवास व दुकानगाळे काढले. परिसराचे सौंदर्यीकरण केले. यासाठी भद्रावती पालिकेला कोट्यवधी रुपयांचा खर्च आला. मात्र, या जमिनीचे वारसदार असलेले माजी नगरसेवक प्रशांत कारेकर, संजय कारेकर यांनी या सर्व जागेवर आपला हक्‍क सांगत भक्‍तनिवासाला बेकायदेशीर व जबरदस्तीने कुलूप ठोकले. हे भक्‍तनिवास पालिकेने सुशांत पद्‌मगिरीवार यांना चालवायला दिले आहे. घटनेच्यावेळी पद्‌मगिरीवार यांचा नोकर भक्‍तनिवासात होता. त्याला बाहेर काढून निवासाला प्रशांत कारेकर, संजय कारेकर व नगरसेवक नंदू पढाल यांनी कुलूप ठोकले. घटनेची तक्रार सुशांत पद्‌मगिरीवार यांनी पालिकेकडे केल्यानंतर पालिकेने तिघांच्या विरोधात तक्रार दाखल केली. त्यानुसार भद्रावती पोलिसांनी या तिघांवर फौजदारी गुन्हा दाखल केला आहे.

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Crimes against a former councilor through a land dispute